Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

‘ लोकमत’च्या वतीने कर्तृत्वशालिनींचा सन्मान … नगरसेविका ‘माधवी राजापूरे’ यांच्या समाजकार्याची घेतली दखल!

महाराष्ट्र 14 न्यूज : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामिगरी करणाऱ्या कर्तृत्वशालिनींचा जीवनपट उलगडणाऱ्या लोकमत वूमन ॲचिव्हर्स ‘चा सत्कार तसेच ‘कॉफी टेबल बुक’ चा प्रकाशन सोहळा १० जानेवारी, २०२१ रोजी दुपारी ४.०० वा. हॉटेल रिट्ज-कार्ल्टन गोल्फ कोर्स स्वअर, एअर पोर्ट रोड, पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे . लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी आणि इंद्रायणी थडी यांच्या सहयोगाने हा सोहळा होणार आहे .

महाविकास आघाडीतील राज्यमंत्री अदिती तटकरे , पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अभिनेता स्वप्निल जोशी, इंद्रायणी थडीच्या संस्थापिका पूजा लांडगे, डी वाय पाटीलच्या भाग्यश्री पाटील, ग्रॅव्हिटिएस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे . कुटुंब आणि समाजातील अनेकांचा आधारस्तंभ बनलेल्या या गुणी महिलांचा प्रवास ‘ लोकमत’ने जवळून पाहिला आहे . त्यामुळे त्यांचा ‘ लोकमत वूमन अँचिव्हर्स ऑफ पिंपरी चिंचवड ‘ सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे .

Google Ad

यावेळी समाजासाठी सामाजिक कार्यातून योगदान देणाऱ्या महिलांची माहिती ‘लोकमत’ ने घेतली आणि खरोखरच समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड असणाऱ्या कर्तृत्ववान महिला या उद्योगनगरीत आपले सेवादानाचे बहुमोल असे कार्य करत आहेत, आणि त्यांचा योग्य तो सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे, हे ओळखून ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या वतीने जयश्री फिरोदिया, नगरसेविका माधवीताई राजापूरे, पूजा लांडगे, अदिती हर्डीकर, आशा शेंडगे, आरतीताई चोंधे, भारती विनोदे, चैताली चौधरी-भोईर, दीपाली जाधव, जयश्री भोंडवे, कल्पना काशीद, डॉ . कांचन वायकुळे, किरण किल्लावाला, क्षमा धुमाळ, लीनाश्री आहिरे, डॉ . मधुरा जोशी, प्रा . पूजा वायकुळे, प्राची धबल देब, प्रतीक्षा घुले, सुप्रियाताई चांदगुडे, प्रा . सुरेखा कटारिया, तेजस्विनी ढोमसे, सवाई डॉ . वर्षा कु – हाडे, डॉ . विद्या देवरे, विनयाताई तापकीर, वृषाली कलाटे, योगिता नागरगोजे, रेखा दर्शले, रुपाली ओव्हाळ, रुपालीताई आल्हाट, सुलभा उबाळे, सपना देवतळे, डॉ . सारिका भोईर, सारिका बारमुख, सरिता सिंग, सीमा सावळे, शैलजा मोरे, शर्मिला बाबर, शितल कलाटे, सोहीनी गांगुली, श्रद्धा पेठे, शुभांगी लोंढे, शुभांगी तरस, डॉ.श्वेता इंगळे – सरकार, सुधाताई सुळे – आजबे, सुलोचनाताई आवारे या ५१ कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे. सामान्य ते असामान्य अशा प्रवासातील कार्यरत महिलांची दखल घेणारा , त्यांना सन्मान आणि अभिमान याची जाणीव देणारा हा सोहळा आहे .

पंखातील बळ , जबर महत्त्वाकांक्षा आणि अविरत कष्टाच्या जोरावर आज या महिलांनी यशोशिखर गाठले . कुटुंबांचे व्यवस्थापन हे अत्यंत जिकिरीचे काम असताना महिला ती जबाबदारी लीलया पेलतात . खाचखळग्यांनी पुरेपूर भरलेल्या अशा या वाटेवर त्यांनी स्वत : चं स्वत : चा मार्ग तयार केला . आज या कर्तृत्ववान महिलांची गगनभरारी अमर्यादित असून इतरांना अचंबित करणारी आणि प्रेरणा देणारीही आहे . त्यांचा हा यशस्वी प्रवास , यशोगाथा निश्चितच अनेक धडपडणाऱ्या तरुणींना नकळत प्रेरणा देऊन जाईल . त्यांच्याकडे पाहून अनेकींना नवी आशा दिसते . त्यामुळेच तर त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास अवघ्या जगासमोर आणण्यासाठीचा हा एक ‘लोकमत’ चा कौतुक सोहळा आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!