Google Ad
Editor Choice Maharashtra

नितीन गडकरी यांची पुण्यात मोठी घोषणा … दोन्ही पालखी मार्गाचे काम या एक दीड वर्षात पूर्ण करण्यात येणार!

महाराष्ट्र 14 न्यूज : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखी मार्गाचे काम या एक दीड वर्षात पूर्ण करण्यात येणार असून, दोन्ही मार्गांसाठी 12 हजार कोटी खर्च येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय. पुण्यात नितीन गडकरींनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिलीय.

चांदणी चौक तसेच कात्रज रस्ता यासाठी 400 कोटी रुपये बांधकामावर खर्च करण्यात येणार असून, जमीन अधिग्रहणावर 400 कोटी खर्च आहे. या रस्त्याबाबतच्या इतर अडचणी दूर केल्या आहेत. फक्त यासाठी थोडा जास्त वेळ लागतोय, तो कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असंही नितीन गडकरी म्हणालेत.

Google Ad

ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम वेगाने सुरूः नितीन गडकरी

ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम वेगाने सुरू असून, तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम ही लवकरच वेगाने सुरू केले जाणार आहे. फेब्रुवारीनंतर मोठा कार्यक्रम घेऊन हे काम सुरू करणार असल्याचंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितलंय.

दोन्ही पालखी मार्ग केवळ रस्ते न राहता भक्ती मार्ग व्हावेतः नितीन गडकरी
या रस्त्यासाठी 12 हजार कोटी खर्च करणार आहोत. दोन्ही पालखी मार्ग केवळ रस्ते न राहता भक्ती मार्ग व्हावेत, अशी योजना आहे. त्यासाठी नागरिकांनी आणि तज्ज्ञांनी कल्पना मांडाव्यात, त्या स्वीकारल्या जातील, असंही नितीन गडकरींनी सांगितलंय.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!