Google Ad
Editor Choice india

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद शपथविधीनंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७जुलै) : भाजप नेते नारायण राणे आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात ठसा उमटविलेले भाजपाचे खासदार कपिल मोरेश्वर पाटील यांच्या रुपाने ठाणे जिल्ह्याला प्रथमच केंद्रात राज्यमंत्रीपदावर वर्णी लागली आहे. खासदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीने कपिल पाटील यांना बहुमान मिळाला. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्रिपद दिल्यामुळे आनंद वाटत असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो असल्याचे राणेंनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मिळेल ती जबाबदारी स्विकारणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानतंर नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपन नेते नारायण राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. यावेळी नारायण राणे यांनी म्हटलं आहे की, एवढ्या वर्षाचा प्रवास दोन वाक्यात सांगणं शक्य नाही.

Google Ad

आज सांगयाला आनंद वाटत आहे की, प्रथम १९८५ मध्ये नगरसेवक झालो त्यानंतर बीएमसी चेअरमन आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि आता केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतली याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे आणि त्यांच्यामुळे मंत्रिमंडळात सहभाग होऊ शकला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ते देतील ती जबाबदारी संभाळीन त्यांच्या अज्ञेप्रमाणे काम करेल महाराष्ट्राला मंत्रिपद मिळाल्याने महाराष्ट्राला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असं नाराणय राणे यांनी म्हटलं आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

64 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!