Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रं. ३१ मध्ये आरोग्य विभागाच्या वतीने गांधीगिरी … रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना दिले गुलाब पुष्प!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७जुलै) : पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश झाला. त्यामुळे शहरातील पिंपळे गुरव भागात त्याअंतर्गत कामे सुरू आहेत. शहर स्मार्ट सिटी कडे वाटचाल करत असताना शहरातील रस्तेही स्मार्ट बनविले गेले आहेत, त्याचबरोबर कचरा कुंडी विरहित प्रभाग असावा असे लोकप्रतिनिधीनाही वाटते परंतु याकरीता नागरिकांची साथ महत्त्वाची आहे.

आजही घंटागाडी घरोघरचा कचरा गोळा करत असतानाही नागरिक आपला कचरा गाडीत न टाकता इतरत्र टाकतात, असे चित्र शहरातील अनेक प्रभागात आजही पहावयास मिळते. आपला प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचारी अहोरात्र काम करताना दिसतात. शहरातील प्रभाग क्रमांक ३१ मध्ये आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना विषयक विशेष स्वच्छता मोहीम ‘मयुर नगरी ते एम के चौक’ या ठिकाणी करण्यात आली. त्या भागातील नागरिकांना गुलाब पुष्प देऊन सन्मानाने घरातील कचरा घंटागाडी मध्ये देण्याचे सुचित केले, परिसर स्वछ ठेवणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रबोधनही केले तसेच सदर भागामधील ५.५ घनमीटर कचराकुंड्या उचलून घेऊन सदर परिसर कचराकुंडी विरहित करण्यात आलेला आहे.

Google Ad

१०० पेक्षा जास्त नागरिकांना गुलाब पुष्प देण्यात आले.  सदर परिसरामध्ये साफसफाई करून घेऊन औषध फवारणी पावडर फवारणी करण्यात आलेली आहे. तसेच कचरा टाकणाऱ्या नागरिकांना समज देण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांनाही या ठिकाणी थांबवल्याचे दिसून आले. आरोग्य विभागाकडून याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आलेल्या आहेत, लवकरच प्रभाग क्रमांक ३१ कचराकुंडीविरहित करण्यात येणार असल्याचे आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांनी सांगितले. याकामी प्रभागातील सर्व नगरसेवक, नागरिक यांच्या सहकार्याने तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय आरोग्य कार्यकारी अधिकारी बी.बी कांबळे सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले मुख्य आरोग्य निरीक्षक चंद्रकांत रोकडे यांच्या मार्गदर्शनाने हे होत आहे,
असेही ते यावेळी म्हणाले.

सदर कामकाज आरोग्य सहाय्यक दशरथ कांबळे आरोग्य मुकादम कविता गोहेर व आरोग्य कर्मचारी सिद्धार्थ जगताप, विनोद कांबळे, कुणाल कांबळे, रामदास मोझे, मारुती देवकुळे, गणेश भंडारी, आनंद फंड व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!