Google Ad
Agriculture News Food & Drinks Maharashtra

माझे आरोग्य : आपले जीवन सुखी निरोगी बनवायचे असेल तर … हे जरूर करा ती काळाची गरज आहे!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( माझे आरोग्य ) : आजपासून फक्त २० वर्षा नंतर प्रत्तेक घरात एक पेशंट कँसर चा असणार. आज ही गोष्ट कुणाला खरी वाटणार नाही. पण हे १००% सत्य आहे. २० -२५ वर्षा पूर्वी अनेक संशोधक अभ्यासक सांगत होते. रासायनिक खतांचे- औषधांचे भविष्यात खूप भयंकर वाईट परिणाम दिसणार आहेत, पण तेव्हा ते कुणाला खरे वाटले नव्हते.

आज प्रत्तेक घरात एक तरी पेशंट डायबीटीस,ब्लडप्रेशर, हृदय आजार, ट्युमर ने ग्रस्त आहे. ४० वर्षापुढिल ४०% लोकांना डायबीटीस आहे. २५% लोकांना ब्लडप्रेशर आहे. १०% लोकांना ट्युमर आहे. ५% लोकांना कँसर आहे. ५% लोकांना हार्ट चा प्रॉब्लेम आहे. ५% लोकांना पँरालीसीस आहे. ५% लोकांना ईतर आजार आहेत. ५% लोकांना किडनिचा प्रॉब्लेम आहे. फक्त २% लोकच नॉर्मल जगणार आहेत.

Google Ad

आपले जीवन सुखकर निरोगी बनवायचे असेल तर शुद्ध अन्न आणि पाणी हीच काळाची गरज आहे. पाणी आपण फिल्टर चे पिऊ पण अन्नाचे काय? ते कसे शुद्ध करणार? ते शुद्ध अन्न धान्य पिकवीने फक्त शेतकऱ्यांच्या च हातात आहे. शेतकरी कुणा एकट्याचे ऐकत नाहीत. सर्व समाजाने जागरूकता दाखवून यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले पाहिजे. तसेच त्याच्या मालाला योग्य भाव देखील दिला पाहिजे तरच हे शक्य आहे. सेंद्रिय शेती – ऑर्गेनीक फार्मींग , निसर्ग शेती , झिरो बजेट शेती , रसायनमुक्त शेती चे महत्व त्यांना पटवून दयायला हावे.

आपला विश्वास बसणार नाही ९०% शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीवर विश्वासच नाही. रासायनिक खते व कीटकनाशके औषधांशिवाय शेती ही कल्पनाच त्यांना मान्य नाही. पुढील दुष्परिणामाची त्यांना अजिबात चिंता नाही. आज माझे पीक चांगले आले पाहिजे हाच विचार त्यांच्या डोक्यात असतो. आणि त्यासाठी वाटेल ती भयानक विषारी कीटकनाषके औषधे, खते ते वापरत असतात.

घरात एकाला जरी कँसर झाला तर त्याला वाचविण्यासाठी ५० लाख खर्च येतो. त्याच्या उपचारा साठी ३-४ एकर शेती विकावी लागेल. याचा तरुण शेतकऱ्यांनी जरूर विचार करावा. नंतर आपल्याला दुसऱ्याच्या शेतात काम करून पोट भरावे लागेल हे नक्की. वेळीच सावध झाले पहिजे. शेणखत – कोंबडीखत – बकरांचे लेंडीखत गोमूत्र, बाजारातही अनेक सेंद्रिय खते मिळतात. आज आपल्या कर्मावरच देशाचे भविष्य अवलंबुन आहे.

सरकार यावर बंदी आणू शकत नाही. कारण सरकार १२५ कोटी लोकांना धान्य पुरवू शकत नाही. तरुणांनी, शेतकरी बंधूनी व समाजानेही जरूर याचा विचार करून शेतकरी प्रबोधनाची चळवळ राबवायला हवी. “सशक्त भारत- समृद्ध भारत- निरोगी भारत “ घडवायचा असेल,तर अशा विचारांचा जरूर प्रसार करायला हवा. ते आपले सर्वांचे कर्तव्यच नाही तर ती आपली गरज झाली आहे.

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!