Google Ad
Editor Choice india

Mumbai : तापमानाचा पारा घसरणार … थंडीच्या दिवसात होणार पावसाचा शिडकावा … काय आहे, हवामानाचा अंदाज?

महाराष्ट्र 14 न्यूज : कडाक्याची थंडी, गुलाबी थंडी असा डिसेंबरचा महिना संपल्याबरोबर थंडीनेही पाठ फिरवली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार उत्तर भारतात शीतलहरीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बहुतेक भागात हलक्या सरींचा पाऊस पडला. भारतीय हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलाय.

जम्मू-काश्मीरमधून सपाट भागात हलक्या सरींचा पाऊस आणि बर्फवृष्टी दिसून आली. लडाख प्रदेशातील हवामान कोरडेच राहिले. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार 6 आणि 7 जानेवारीला पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पाऊस होऊ शकतो.

Google Ad

सध्या पश्चिमेकडून येणारे बााष्पयुक्त वारे देशभरात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण करत आहेत. उत्तर भारतातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. राजधानी दिल्लीत प्रचंड कडाक्याच्या थंडीनंतर अचानक शनिवारी ढग दाटून आले आणि विजांसह पाऊस झाला. उत्तर प्रदेशातही अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण होतं.

कडाक्याची थंडी, गुलाबी थंडी असा डिसेंबरचा महिना संपल्याबरोबर थंडीनेही पाठ फिरवली आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार 6 आणि 7 जानेवारीला पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पाऊस होऊ शकतो.

सध्या पश्चिमेकडून येणारे बााष्पयुक्त वारे देशभरात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण करत आहेत. उत्तर भारतातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. राजधानी दिल्लीत प्रचंड कडाक्याच्या थंडीनंतर अचानक शनिवारी ढग दाटून आले आणि विजांसह पाऊस झाला. उत्तर प्रदेशातही अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण होतं.


गेल्या काही दिवसात राज्यातल्या बहुतेक ठिकाणी तापमानात वाढ झाली. पण पुन्हा एकदा थंडी परतणार आहे, असाही हवामानाचा अंदाज आहे. होसाळीकर यांनी नोंदवलेल्या अंदाजानुसार, राज्यातल्या किमान तापमानात येत्या ३,४ दिवसात लघु पडजड होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे इथे किमान तापमान 16-18 च्या आसपास असेल तर नाशिक, पुणे इथे 14-16 अंश सेल्सिअस तापमान असेल. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात किमान तापमान 18 ते 20°C दरम्यान असेल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!