Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : देशमुखांची खुर्ची धोक्यात … गृहमंत्री पदासाठी राष्ट्रवादीतून ‘ ही ‘ नावे चर्चेत

महाराष्ट्र 14 न्यूज : सचिन वाझे प्रकरणानंतर सध्या राजकीय वर्तुळातील वातावरण बदलेले आहे. वाझे यांच्या प्रकरणावरून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पदावरून दूर करण्यात आले. यानंतर आता थेट गृहमंत्र्यांना देखील पदावरून दूर करण्याच्या चर्चा सध्या रंगली आहे.

नवी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात जवळपास २ तास महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी मुंबईतील घडामोडींबाबत गृहमंत्र्यांकडून सविस्तर माहिती घेतली. तसेच पोलीस यंत्रणेकडून झालेल्या कामांबाबत शरद पवार यांनी गृहमंत्र्यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सचिन वाझे प्रकरणावरून शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे.

Google Ad

त्यामुळे गृहमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून नव्या नेत्याच्या नावाची चर्चा होत आहे. गृहमंत्री खात्यासाठी राष्ट्रवादीतून अजित पवार आणि जयंत पाटील हे स्पर्धेत असल्याची चर्चा असताना आता या पदासाठी राष्ट्रवादीकडून राजेश टोपे यांच्या नावाचा विचार होत असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे कार्यर्र्त आहेत. कोरोन काळात त्यांनीत्यांची जबबदारी अगदी चोख पणे पार पडली. त्यामुळे गृहखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच देण्याचा विचार असल्याचे म्हंटले जात आहे. त्यात आता राजेश टोपे यांना शरद पवार यांनी दिल्लीतही बोलावून घेतल्याने गृह खात्याबाबत काय महत्वपूर्ण माहिती समोर येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

27 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!