Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : घुंगरू वाजणार … लोक कलावंतांसाठी अजितदादांनी घेतला मोठा निर्णय!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन दरम्यान राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला मोठा फटका बसला. त्यानंतर आता चित्रपटगृहे, नाट्यगृहे यासोबतच मोकळ्या जागेत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना अटीशर्तीच्या आधारावर परवानगी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेने विविध मागण्यांसाठी काही दिवसांपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळताच त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी संवाद साधत तमाशाला परवानगी देण्यात यावी,असे निर्देश दिले आहेत.त्यानुसार,आज सरकारने याबाबतचा शासन निर्णय काढला आहे.

Google Ad

तसेच,पुढच्या आठवड्यात तमाशा फड मालकांच्या अनुदान पॅकेज आणि इतर मागण्यांसाठी बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.या बैठकीला जुन्नरचे आमदार अतुलशेठ बेनके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कला व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील,पुणे जिल्हा उपाध्यक्ष मोहित नारायणगांवकर उपस्थित राहणार आहेत.सरकारच्या सकारात्मक निर्णयानंतर तमाशा कलावंतांनी सरकारचे जाहीर आभार व्यक्त केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

40 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!