Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे आयोजित पाककला स्पर्धेचे साई व्हिजन सोसायटी मधील सौ.काजल मंत्री ठरल्या मानकरी .

महाराष्ट्र 14 न्यूज : आमदार श्री. लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर मधील महिलांसाठी पिंपळे सौदागर मास्टर शेफ-२०२१ ‘शोध सुगरणीचा’ या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत जवळपास १२० महिलांनी सहभाग घेतला होता* दि.१३/०२/२०२१ रोजी स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली असून रविवार दि.१४/०२/२०२१ रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी घेण्यात आली अंतिम फेरी पाहण्यासाठी ४०० ते ५०० माहिला प्रेक्षकांनी आपली उपस्थिती नोंदवली यामध्ये काजल डोके, मेघा पाटील, सुप्रिया गुडीकंडलू, शितल पदमवार, काजल मंत्री, नेहा मेंडपारा, पौर्णिमा नाईक, नेहा मल्होत्रा, जान्हवी कितेय, दिप्ती कलकोटवार अश्या १० स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.यावेळी स्पर्धेचे परीक्षण मुख्य परीक्षक सौ.अलका फडणीस,श्री.विवेक फडणीस आणि श्री.प्रसाद कुलकर्णी यांनी केले.

Google Ad

अंतिम फेरीसाठी स्पर्धकांनी सादर केलेल्या पदार्थांमधून प्रथम ३ विजेत्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये प्रथम पारितोषिक काजल मंत्री, द्वितीय पारितोषिक नेहा मल्होत्रा, तृतीय पारितोषिक पौर्णिमा नाईक यांनी पटकाविले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकास आणि स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या महिला प्रेक्षकांस आकर्षक भेटवस्तू यावेळी देण्यात आली. *बक्षीस वितरण सोहळा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नगरसेविका आरतीताई चोंधे, सुनीताताई तापकीर,स्वप्नालीताई काटे,कुंदाताई भिसे आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी महापौर म्हणाल्या निर्मलाताई कुटे यांनी पाककला स्पर्धेचे आयोजन केले त्याबद्दल प्रथम अभिनंदन. असा पाककला स्पर्धेचा कार्यक्रम शहरामध्ये प्रथमच आयोजित करून महिलांना त्यांचे कौशल्य सादर करण्यासाठी एक भव्य व्यासपीठ उपलब्ध क़रुन दिल्याबद्दल निर्मलाताई कुटे यांचे आभार मानले. अशाच संधी नेहमी महिलांना उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून महिलांमधील कलागुणांना वाव मिळेल.


यावेळी मान्यवरांचे आभार मानताना निर्मलाताई कुटे यांनी वॉर्डामध्ये केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली व यापुढील काळामध्ये महिलांमधील कलागुणांना कसा वाव देता येईल व अश्या प्रकारच्या कार्यक्रमांमधुन महिलांना आत्मनिर्भर बनऊन त्यांना अर्थिक दृष्टया सक्षम बनवण्या साठीच्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!