Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

Moshi : पेट्रोल पंपावर दरोड्याचा डाव पोलिसांनी उधळला … दरोडेखोरांच्या टोळीला केली अटक!

महाराष्ट्र 14 न्यूज : मोशी येथील काजळे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा डाव पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने उधळून लावला आहे . सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे . त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून , त्यांचे तीन साथीदार पळून गेले आहेत . सोमवारी ( २१ सप्टेंबर ) पोलिसांनी रात्री पावणेदहा वाजता ही कारवाई केली आहे . आरोपींना कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली .

राहुल रमेश चव्हाण ( वय १९ , रा . दिघी , पुणे ) , शेखर संभाजी जाधव ( वय २१ , रा . लातूर ) , करण गुरुनाथ राठोड ( वय १९ , रा . भोसरी पुणे ) , र कृष्णा संजय तांगतोडे ( वय २० , रा . नाशिक ) यांना अटक करण्यात आलीआहे . याशिवाय दोन १७ वर्षीय मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार , काही युवक दुचाकीवर दिघी येथील पोलाइट पॅनोरमा बिल्डिंगच्या जवळ असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बाजूला मोकळ्या मैदानात संशयितरित्या थांबले आहेत .

Google Ad

त्यांच्याकडे घातक शस्त्रे असून , ते दरोडा घालणार आहेत , अशी माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकातील कर्मचारी किरण काटकर व नितीन लोखंडे यांना मिळाली . त्यानुसार पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली असता नऊ जण संशयितरित्या थांबले होते . रात्री पावणेदहा वाजता पोलिसांनी सापळा लावून त्यांच्यावर छापा टाकला . पोलिसांनी दरोडेखोरांपैकी सहा जणांना पकडले , तर तीन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले . ताब्यात घेतलेल्या सहा जणांमध्ये दोघे जण अल्पवयीन आहेत . त्यांच्याकडून पोलिसांनी एक सुरा , पाच कोयते , एक मोबाइल फोन , दोन दुचाकी असा एकूण ९० हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!