Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नवी संगवीत एमएनजीएलची गॅस लाईन फुटली … गॅस पुरवठा बंद झाल्याने सांगवीकर त्रस्त !

महाराष्ट्र 14 न्यूज : पाइपलाइनद्वारे पुरवण्यात येणारा गॅसचा पुरवठा बुधवारी (ता.१६ सप्टेंबर ) दुपारी अचानक बंद झाल्याने पिंपळे गुरव, सांगवी आणि नवी सांगवी येथील अनेक सोसायट्यांमधील रहिवाशांची गैरसोय झाली. स्वयंपाकाची वेळ असल्याने महिलांची तारांबळ झाल्याने अनेक कुटुंबीय त्रस्त झाली. नवी सांगवी मधील महेश्वरी चौकात महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम चालू असून, त्याअंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्यात येत आहे.

हे काम करत असताना दुपारी १२ वाजता जेसीबीच्या साहाय्याने खोदाई करत असताना रोड क्रॉसिंग झालेली गॅस ची लाइनला जेसीबी चा धक्का लागला आणि लाइन फुटून त्यातून गॅस बाहेर येऊ लागला, महाराष्ट्र नॅचरल गॅस चे अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रवाह बंद केल्याने अनर्थ टळला, तसेच ताबडतोब कामही सुरू केल्याचे दिसून आले. सांगवी, नवी सांगवी परिसरात असलेल्या काही सोसायट्यांना तसेच पंप यांना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) मार्फत गॅसचा पुरवठा करण्यात येतो.

Google Ad

दुपारच्या सुमारास गॅस पुरवठा पूर्ण थांबला होता. त्यामुळे काहीही बनवता आले नाही. पर्यायी व्यवस्थेसाठी ऐनवेळी धावपळ करावी लागली. एमएनजीएलच्या पथकाने त्वरित त्या ठिकाणी धाव घेत पुरवठ्यातील अडचणी दूर केल्या, तसेच रस्त्याच्या खाली खोदाई चे काम करताना संबंधित अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन काम करावे , गॅस लाइन जेथे रस्ता क्रॉस करते तेथे काहीतरी मार्किंग करावे म्हणजे नागरिकांची होणारी गैरसोयी टळेल व अपघात होणार नाहीत असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!