Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad Pune

पीसीएमसी ते फुगेवाडी ६ किलोमीटर मार्गावर मेट्रो चाचणी पूर्ण … पुणे महामेट्रोने केलेल्या अथक प्रयत्नाचे फळ!

महाराष्ट्र 14 न्यूज,( दि. ०३ जानेवारी२०२१ ): पुणे मेट्रोच्या कामाने वेग घेतला असून आतापर्यंत ४५ % काम पूर्ण झाले आहे. पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये व्हायाडक्ट, स्टेशन आणि भूमिगत मार्गांची कामे प्रगतीपथावर चालू आहेत.

वनाज व रेंज हिल्स येथील डेपो उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. पीसीएमसी ते संत तुकारामनगर या १ किमी मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. आज बरोबर एक वर्षांनी ही दुसरी चाचणी घेण्यात आली. आजच्या दुसऱ्या चाचणीसाठी आज पीसीएमसी ते फुगेवाडी या साधारणतः ६ किमी मार्गावर मेट्रो ट्रेन धावली.

Google Ad

कोरोना संसर्गामुळे ६ ते ७ महिने कामाचा वेग बाधित झाला. तरीदेखील हा महत्वपूर्ण टप्पा मेट्रोने आज पारित केला. दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी मेट्रो ट्रेन PCMC स्थानकावरून सुटली आणि दु २ वा फुगेवाडी स्थानकावर पोहोचली.
आजच्या महत्वपूर्ण चाचणीसाठी मेट्रोचे कार्यकारी संचालक डी. डी. मिश्रा, मुख्य प्रकल्प अभियंता रवी कुमार, संदीप साकले, श्रीराम मांझी, राजा रमण, रवी टाटा या मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केले. चेतन फडके या ट्रेन ऑपरेटर ने आजच्या चाचणीवेळी ट्रेन चालविली.

या चाचणीसाठी ओएचई (OHE) तारा २५ के.व्ही विद्युत भाराने सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत प्रभावित केल्या होत्या. विद्युत तारांची तंदुरुस्ती तसेच ६ किमी रेल्वे रूळ (ट्रॅक) त्याची सुरक्षेतेच्या दृष्टीने निरीक्षण अश्या अनेक बाबींची पूर्तता करुन आजची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली.

पुणे मेट्रोचे काम पूर्ण वेळेत करण्यासाठी हा एक महत्वाचा टप्पा आहे. या चाचणीसाठी ३ कोच लांबीची मेट्रो ट्रेन वापरण्यात आली. महामेट्रोचे तांत्रिक कुशल कामगार या चाचणीसाठी अनेक दिवसांपासुन झटत होते. पुणे मेट्रोने रिसर्च, डिझाइन स्टँडर्डाजाइजेशन (RDSO), कमिशनवर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (CMRS) आणि रेल्वे बोर्ड यांच्याकडे आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी अर्ज केला असून चाचणीची पुर्तता महामेट्रोने पूर्ण केली आहे.

आज दि.०३ जाने. (रविवार) घेण्यात आलेली चाचणी ही पुणे मेट्रोच्या कामामधला एक महत्वाचा टप्पा आहे. आजची चाचणी महामेट्रोने केलेल्या अथक प्रयत्नाचे फळ आहे. सर्व पुणेकरांचा पुणे मेट्रोच्या कामात प्रचंड सहयोग यामुळेच महामेट्रो हे काम यशस्वीरीत्या पुर्ण करू शकते, असं महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

44 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!