Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : महाराष्ट्र अनलॉक ४.० नियमावली जाहीर … ईपासची अट रद्द आता प्रवास करणे सोपे!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यातील अनलॉक ४ च्या गाईडलाईन्स आज जाहीर करण्यात आल्या आहे. यात प्रशासनानेकेंद्राच्या सूचनेनंतर राज्यात ई पास रद्द करण्याबाबत निर्णय राज्य सरकारने केला आहे. ई पास रद्द करण्याबाबत दाखवली तयारी दर्शवली होती, त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज याबाबत आणि इतर बाबींबाबत गाईडलाईन्स जाहीर करण्यात आल्या आहे.

तसेच राज्यात रेस्टॉरंट टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची देखील शक्यता आहे. मेट्रो रेल्वे, जिम, मंदिर आताच सुरू करण्याबाबत सरकारचा विचार नाही, असे राज सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Google Ad

यातील काही नियम पुढील प्रमाणे :-

आता राज्यात खासगी वाहनांना ई-पासची आवश्यकता असणार नाही. आता महाराष्ट्रात अंतर्गत फिरताना ई-पासची गरज राहणार नाही.
येत्या ३० सप्टेंबरपर्यंत शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेज, क्लासेस बंद राहणार आहेत.
सार्वजनिक कार्यक्रमांत केवळ ५० नागरिकांना एकत्र येण्याची परवानगी मिळाली आहे. पण फिजिकल डिस्टंसिंगचे नियम पाळावे लागणार आहेत.
मेट्रो, रेल्वे, थिएटर, जिम, मंदिरे अजूनही बंद राहणार आहेत.
खासगी आणि मिनी बसेसना परवानगी देण्यात आली आहे.
हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्णपणे सुरू होण्यास परवानगी देण्यात आल्यानं हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दररोज २०० उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. उद्यापासून १०० विमाने जाणार आणि १०० लँडिंग करणार आहेत. आतापर्यंत कोरोना संकटामुळे हा आकडा ५०-५० असा होता.

मुंबई आणि एमएमआरमध्ये शासकीय कार्यालय ३० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तर, उर्वरित महाराष्ट्रात सरकारी कार्यालयात ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती काम सुरू करता येणार आहे. मात्र, सोशल डिस्टनसिंग आणि मास्क वापरणं बंधनकारक आहे.
हॉटेल आणि लॉज १०० टक्के सुरु होणार असले तरी, मेट्रो आणि थिएटर अद्याप बंदच राहणार आहेत.
शाळा आणि महाविद्यालये ३० सप्टेंबरपर्यंत सुरु करता येणार नाहीत.
स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, बार सभागृह, जिम यांच्यावरील निर्बंध कायम आहेत.
कंटेन्मेंट झोनमध्ये आधीच्याच नियमांनुसार व्यवहार सुरु राहतील.
राज्यातील नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास काढावा लागत होता. ही खूप त्रासाची प्रक्रिया होती. तसेच एसटीने प्रवास करणाऱ्यांना ई-पासची गरज नव्हती. त्यामुळे खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!