Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

महाराष्ट्र 14 न्यूज : सन २०१९-२०२० मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती.  यामध्ये महानगरपालिकेच्या विविध शाळेतील एकूण २१ विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन करून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकविले आहे. या विद्यार्थ्यांचा पुस्तक, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन विशेष सत्कार आज महापौर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसदस्य माउली थोरात, संदिप वाघेरे, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकरी जोत्स्ना शिंदे, शिक्षण अधिकारी पराग मुंढे, पर्यवेक्षक रविंद्र शिंदे, सुनिल लांघी, रजीया खान, अनिता जोशी, राजेंद्र कांगोडे, राम लिंबे, विलास पाटील यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक आदी  उपस्थित होते.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

15 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!