Google Ad
Editor Choice Maharashtra

वाळवा : सामाजिक भान जपत भाटवाडी गावचे सुपुत्र ‘मधुकर पवार’ यांनी दिली ‘चिलाईदेवी’ मंदिरास सोलर दिव्यांच्या माध्यमातून दिवाळीची अनोखी भेट!

महाराष्ट्र 14 न्यूज : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील भाटवाडी गावचे सुपुत्र ‘मधुकर पवार’ यांनी गावातील ग्रामदैवत चिलाई देवी मंदिर व मंदिर परिसरात’सोलर पॅनल’च्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याची संकल्पना मांडली आणि दिवाळीमधील वसुबारस च्या दिवशी या कामाला युद्ध पातळीवर गती मिळाली आणि ते काम पूर्णत्वास गेल्याचे दिसून आले. व्हेईकल चार्जिंग आणि सोलर पॅनल च्या माध्यमातून गावातील मंदिर परिसर सोलर दिव्यांनी उजाळून निघाल्याने गावकऱ्यांनी खरी दिव्यांची दिवाळी अनुभवली , मधुकर पवार यांनी सोलर पॅनलच्या माध्यमातून मंदिराला सौरऊर्जा पुरवण्याचा निर्णय घेतल्याचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे.

जेणेकरून चिलाई मंदिर परिसरात अखंडीत वीज पुरवठा होईल. त्याच प्रमाणे वीज विलापोटी मंदिराचा होणारा खर्च कमी होईल. तसेच काही कारणाने विद्युत खंडित झाला तरी मंदिर परिसरातील वीजपुरवठा अखंडपणे चालू राहणार आहे, या पूर्वीही मधुकर पवार यांनी गावाच्या तसेच मंदिराच्या कार्यात आपले योगदान दिले आहे.

Google Ad

यावेळी बोलताना मधुकर पवार म्हणाले, “समाज संस्कृती आणि संस्कार यातून घडतो आणि मंदिर म्हणजे चालते बोलते विद्यापीठ असून ते दर्जेदार असावे” समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने मी हे समाजकार्य करत असतो, आणि हेच माझे कर्तव्य समजून समाजासाठी व आपल्या गावासाठी काहीतरी योगदान द्यावे असे मला आणि माझ्या कुटुंबाला वाटते.

सामाजिक कार्यकर्ते मधुकर पवार यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई आत्माराम पवार यांच्या हस्ते सोलर लाईट च्या दिव्यांचा स्वीच चालू करून उदघाटन करण्यात आले यावेळी सरपंच सुरेश उथळे, सोसायटीचे चेअरमन सुरेश देवकर, मानकरी अरविंद जाधव, आनंदा जाधव, मानसिंग जाधव, राजेंद्र पुजारी,सामाजिक कार्यकर्ते सुनील दमे, सुयोग माने, शंकर पाटील तसेच पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. यावेळी संपुर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाल्याने गावकऱ्यांनी दिवाळीच्या सणाचा आनंद साजरा केला.या ग्रामदेवता चिलाई देवी आणि मंदिरासाठीच्या सर्वतोपरी सुविधा मंदिरास उपलब्ध करून देण्यावर मधुकर पवार यांचा भर असल्याचे यावेळी दिसून आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

34 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!