Google Ad
Editor Choice Maharashtra crimes Pune

Pune : एकाच सोसायटीमध्ये राहणाऱ्या … शेजारच्याच्या त्रासाला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यातील कोंढवा येथे सोसायटीमधील नागरिकांच्या त्रासाला कंटाळून एका ४१ वर्षीय व्यक्तीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली . आत्महत्या करण्यापूर्वी त्रास देणाऱ्या या सभासदांच्या नावाचा व्हिडिओ या व्यक्तीने आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करून ठेवल्याचे समोर आले आहे . या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे . भोलेनाथ उर्फ विजय कवडे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे . या प्रकरणी त्यांची पत्नी मंगल कवडे ( वय ३६ , शिवनेरी नगर गल्ली , कोंढवा खुर्द ) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे . गोविंद कदम , श्रीकांत घोडके , बसवराज कनजे , खेमराज देसाई , अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत .

कोंढवा येथील शिवगंगा हाइट्स या सोसायटीमध्ये गेल्या महिन्यात १४ ऑगस्टला हा प्रकार घडला . कवडे आणि आरोपी हे सर्व एकाच सोसायटीत राहतात . कवडे यांचा मुलगा आणि आरोपी यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता . हे आरोपी कवडे यांना त्रास देत होते . त्यांच्या मुलाच्या वागणुकीवरून ते कवडे यांना बोलत होते . आरोपी कवडे यांच्या अंगावर धावूनदेखील गेले होते . या त्रासाला कंटाळून कवडे यांनी बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली .

Google Ad

आरोपींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा एक व्हिडिओ कवडे यांच्या मोबाइलमध्ये सापडला . त्यामध्ये या चारही आरोपींची नावे घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली . या गुन्ह्याचा तपास करताना हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला . त्यानुसार पोलिसांनी संबधित आरोपींना अटक केली असून , त्यांच्याकडे चौकशी सुरू माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर यांनी दिली .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

25 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!