Google Ad
Editor Choice

गॅलेक्सी किड्स स्कूलच्या छोट्या कमांडोंनी साजरा केला … ‘कारगिल विजय दिवस’

महाराष्ट्र 4 न्यूज, (दि.२६ जुलै) : मोशी येथील गॅलेक्सी किड्स स्कूल च्या छोट्या कमांडोंनी कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व बाल कमांडोंनी सैनिक युवा फोर्स व सनफ्लावर पब्लिक स्कूल यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला याप्रसंगी सर्व छोट्या बाल कमांडोंनी कारगिल युद्धातील शूरवीरांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन श्री लक्ष्मण चव्हाण, डॉ. विवेक मुगळीकर (व. पो. नि. हिंजवडी) आणि सुरेखा घारगे मॅडम (पी एम आर डी ए) यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमानिमित्त बोलताना कॅप्टन चव्हाण यांनी छोट्या कमांडोंना देश सेवेसाठी सैन्यामध्ये भरती होण्याचे आवाहन केले आणि सैन्या मधील संधी विषयी मार्गदर्शन केले.

यानंतर या छोट्या कमांडोंनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राजेश पाटील यांची भेट घेतली याप्रसंगी राजेश पाटील यांनी छोट्या कमांडोंना महानगरपालिकेच्या कामकाजाविषयी माहिती दिली व छोट्या कमांडोंना देश सेवेसाठी प्रोत्साहित केले. याप्रसंगी बोलताना डॉक्टर पाटील यांनी छोट्या कमांडो चे कौतुक केले आणि त्यांना आपल्यापेक्षाही मोठे अधिकारी होण्यासाठी सांगितले. याप्रसंगी महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा या छोट्या कमांडोंबरोबर कारगिल विजय दिवस साजरा केला. जेव्हा या छोट्या कमांडोंनी महानगरपालिकेतील पोलीस अधिकाऱ्यांना जय हिंद म्हणून सॅल्यूट केला तेव्हा त्या अधिकाऱ्यांचा उर अभिमानाने भरून आला.

Google Ad

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गॅलेक्सी किड्स स्कूलच्या प्राचार्य सौ. माधवी जनार्दनन, सर्व शिक्षक वर्ग, तसेच संस्थेचे संचालक मंडळ यांनी मेहनत घेतली, तसेच इतक्या लहान वयात विद्यार्थ्यांना देश सेवेचे बाळकडू देण्यात येत असल्याने संस्थेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९९ मध्ये २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असे घोषित केले. ऑपरेशन विजयद्वारे कारगिल युद्धामधील पाकिस्तानवर मात करण्याचा तो आनंददायी क्षण होता. सैन्य, अर्ध सैन्यदल आणि वायुसेना मिळून ३० हजार सैनिकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारगिल युद्धात भाग घेतला. यावेळी भारतीय वायुसेनेकडून ऑपरेशन सफेद सागर सुरू झाले. भूदल सैन्याची ने-आण करण्याची मोठी भूमिका वायुसेनेने निभावली.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!