Google Ad
Editor Choice Education Pimpri Chinchwad

कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान व कै.उल्हास साठे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने … शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार!

महाराष्ट्र 14 न्यूज : कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान व कै.उल्हास साठे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज 4 सप्टेंबर 2020 5 सप्टेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी चे परीक्षा नियंत्रक प्रमोद भडकवाडे व रवींद्र बाईत यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमोद भडकवाडे त्यांच्या भाषणात त्यांनी आता चाललेल्या लॉक डाऊन असल्यामुळे सर्व शाळा बंद आहे या काळात ऑनलाईन शिक्षण कसे द्यावे याचे मार्गदर्शन उपस्थित शिक्षकांना केले.

आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार मान्यवर खालील प्रमाणे सुभाष गारगोटे व संजय झराड (जनता शिक्षण संस्था) सुनिल साठे (ऑल सेट्स हाय स्कूल खडकी)  श्री. झांजरे एच.बी. (पीडीईए, न्यु इंग्लिश स्कूल, चांदखेड), सुनीता फडके( विद्यांचल हायस्कूल) मृदुला महाजन (डी वाय पाटील )जागृती धर्माधिकारी मना कांत (सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल )सोनिया बेळगावकर (ऑर्चिड इंग्लिश मीडियम स्कूल) विनायक सुतार (माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ शिवाजीनगर) राजु थापा संतोष म्हात्रे अॅड, सिद्धार्थ अग्रवाल यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अनिल लोखंडे यांनी केले.

Google Ad

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!