Google Ad
Editor Choice kolhapur Maharashtra

Kolhapur : पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी … कोल्हापूरला महापुराचा धोका!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या संसर्गाचा कहर वाढत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात रात्री नंतर पुन्हा पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा वेग वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी धरणांमधील पाणीसाठा मध्ये वाढ होत चालली असून महापुराच्या धोकाही वाढला आहे. धरणक्षेत्रासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात रात्रीपासुन प्रचंड पाऊस सुरू आहे, धरणेही ओसंडून वाहू लागल्याने कोल्हापूर जिल्हयातील पुरस्थिती अजुन बिकट होण्याचा धोका आहे.

धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे उघडले असून मेन गेट या सर्वांच्या मधुन ७००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालु असल्यामुळे पंचगंगा नदी धोका पातळीवर वाहत आहे, त्या पाण्याची फुगवटा पाठीमागे भोगावती नदीवरती येणार असून नदीकाठावरील सर्व गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नदीकाठावरील गावातील पोलीस पाटील,सरपंच, तलाठी ग्रामसेवक, कोतवाल यांनी आपल्या गावातल्या पुरबाधीत कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवावे,असे आवाहन पंचायत समिती राधानगरी यांनी केले आहे.

Google Ad

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असल्याने पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, ‘एनडीआरएफ’च्या कोल्हापूरात दोन, शिरोळ तालुक्यात दोन आणि सांगली जिल्ह्य़ात दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यातील स्थानिक प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्थांना सर्व साधनांसह सतर्क ठेवण्यात आले आहे. आजरा तसेच कोवाडमधील नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मात्र, दुपारपासून पावसाचा जोर ओसरला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!