Google Ad
Editor Choice Education

“ जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ ” सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षाकरीता शालेय पुर्वप्राथमिक वर्ग प्रवेश सुरु

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४जुलै) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित टाळगांव चिखली येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ कामकाज सद्यस्थितीमध्ये सुरु आहे . जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ ” सन २०२१- २०२२ या शैक्षणिक वर्षाकरीता नर्सरी , ज्युनियर केजी , सिनियर केजी या वर्गाकरीता शालेय प्रवेश फॉर्म वाटपाचे कामकाज दिनांक – १६०७/२०२१ ते १ ९ / ०७ / २०२१ या कालावधीमध्ये स .११ ते ५ या वेळेमध्ये ( सुट्टी सोडून ) सुरु करणेत येत आहेत .

शालेय प्रवेशासाठीचा फॉर्म हा “ जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ पाटीलनगर , बगवस्ती , टाळगांव चिखली येथील शाळेमध्ये उपलब्ध करुन देणेत येणार आहे . शालेय प्रवेश फॉर्मची स्विकृती दिनांक – २०/०७/२०२१ पर्यंत ” जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ ” टाळगांव चिखली येथील शाळेमध्ये होणार आहे .

Google Ad

प्राप्त प्रवेश अर्जाची दिनांक – २२/०७/२०२१ रोजी सकळी ११.०० वाजता लॉटरी पध्दतीने सोडत करणेत येवून विद्यार्थांना शाळेमध्ये प्रवेश देणेकामी पुढील कार्यवाही करणेत येणार आहे . असे ( राजेश पाटील ) अध्यक्ष संत तुकाराम महाराज संतपीठ टाळगांव चिखली यांनी कळविले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!