Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

असं असावं … आगळ वेगळं, जीवन दान देणारं ‘कपल चॅलेंज’

महाराष्ट्र 14 न्यूज : ‘जीवनदान देणारं कपल चॕलेंज’…

सगळ जग चॕलेंजमय झालेलं असताना आपल्या कृतीतुन आगळं वेगळं चॕलेज घेवुन ते पुर्ण करुन लोकसेवा करत लोकांना जीवदान देणारी लोक कमीच असतात. महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले या पती पत्नींसारखाच समाजासमोर आपल्या कृतीतुन आर्दश ठेवत डॉ.धनंजय पाटील आणि सौ.भारती धनंजय पाटील यांनी प्लाझ्मा दान करत आदर्श घालुन दिला.

Google Ad

कोविड काळात अथक रुग्णसेवा देत असताना कोविड ने त्यांना गाठले.कोविड मधुन पुर्णतः बरे झाल्यावर या डॉक्टर दांपत्याने पुढे येते रुग्णांची सेवा करण्यासाठीचा प्लाझ्मादानाचा मार्ग स्वीकारत खरी रुग्णसेवा कशी करता येवु शकते हे दाखवुन दिले. सोशल मिडीयावर आगळे वेगळे चॕलेंज घेण्यात सगळे व्यस्त असताना पाटील दांपत्याने घेतलेले हे चॕलेंज नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

अगदी उच्चशिक्षितांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण स्वत:ची आणि पत्नीची एकत्र छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करत आहेत. ‘कपल चॅलेंज’ स्वीकारले असे शीर्षक छायाचित्रावर ठेवण्यात येत आहे. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

नटूनथटून काढलेली छायाचित्रे दाम्पत्यांकडून टाकली जात आहेत. घरगुती समारंभ, सहलीला गेल्यानंतर काढलेली छायाचित्रे प्रसारित करण्यात येत आहेत. पण हे छायाचित्र जगावेगळं आहे, जीवन जगवायला शिकवणार आहे. याच खरचं कौतुक झालं पाहिजे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!