Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

“हे माझं चुकलं का?” … भाजप नगरसेवकाने भोसरी विधानसभा मतदारसंघात पोस्टर लावत उघडपणे व्यक्त केली आपली नाराजी!

महाराष्ट्र 14 न्यूज : भाजप नगरसेवक रवी लांडगे यांनी स्वपक्षाला कोंडीत पकडणारी पोस्टरबाजी केल्यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. “सोयीचे राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं हे माझं चुकलं का?” असा सवाल रवी लांडगेंनी विचारला आहे.

रवी लांडगे यांनी पुण्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघात पोस्टर लावत उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोयीचे राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं हे माझं चुकलं का? असा थेट प्रश्न रवी लांडगेंनी विचारला आहे. त्यांच्या पोस्टरवर #WeSupportRaviLandge असा हॅशटॅग देऊन पाठिराख्यांना समर्थन देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Google Ad

भाजप नगरसेवक रवी लांडगे यांना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डावलले होते. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात नगरसेवक रवी लांडगे यांनी फलक लावले आहेत. 2017 च्या महापालिका निवडणुकीत रवी लांडगे हे एकमेव बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक होते.

“हे  चुकलं का?”

यंदा शेवटची संधी होती, मात्र स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असूनही त्यांना डावलण्यात आलं. अखेर त्यांनी स्थायी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देत पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी आपली उघड नाराजीही व्यक्त केली होती. “चाळीस वर्षांपासून आमचं कुटुंब भाजपची सेवा करतंय, हेच आमच्या कुटुंबाचं चुकलं का?, सोयीचं राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं, गोरगरिबांसाठी बांधलेल्या रुग्णालयाच्या खाजगीकरणाला विरोध केला, हे माझं चुकलं का?” असे अनेक प्रश्न शहरभर लावलेल्या पोस्टरमधून विचारले जात आहेत.

रवी लांडगे यांच्यासह इतरही भाजप नगरसेवक स्वपक्षाला कोंडीत धरत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. मात्र लांडगेंच्या या फलकांची जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. रवी लांडगेंची पोस्टरबाजी आगामी काळात भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकते

Google Ad

About the author

Maharashtra14 News

54 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!