Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

पिंपरी-चिंचवड परिसरात “ पिस्टल ” विक्री च्या क्षेत्रात पाय पसरु पाहत असलेल्या टोळीचा … गुन्हे शाखा युनिट- ४ , पिंपरी चिंचवड कडुन पर्दाफाश!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अवैध अग्निशस्त्रे विक्री करणा – या व्यक्तींची माहिती काढुन त्याचे मुळाशी जावुन सक्त कारवाई करण्या बाबत विशेष मोहिम हाती घेण्याचे पिंपरी चिंचवड , गुन्हे शाखेच्या सर्व अधिकारी व अंमलदारांना आदेशित केले होते .

Google Ad

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट -४ , पिंपरी चिंचवड चे अधिकारी व अंमलदार अवैध गावठी पिस्टल विक्री करणाऱ्या इसमां संदर्भात माहिती काढत असतांना पोशि / १८७२ गोविंद चव्हाण , पोशि / २२ ९ ३ धनाजी शिंदे यांना मिळालेल्या गुप्त बातमीचे आधारे आरोपी रविंद्र सुधाकर औटे , वय -३४ वर्षे , रा – दादा मुंगसे यांची बिल्डींग , खोली नंबर ४० , रासेगाव , ता – खेड जि – पुणे व प्रविण बळीराम उगले , वय ३६ वर्षे , रा- मरकळ चौक , माऊली पार्क , मधुकर काजळे यांची खोली , आळंदी , ता – खेड , जि – पुणे यांना दि .१ ९ / ०३ / २०२१ रोजी ०१:१५ वा दरम्यान ज्योतिबा गार्डन काळेवाडी येथुन ताब्यात घेतले.

आरोपीने विक्रीकरिता आणलेले ०१ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले होते . त्या बाबत वाकड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं- २५२/२०२१ भारतीय शस्त्र अधिनियम १ ९ ५ ९ चे कलम ३.५ ( २५ ) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा युनिट -४ कडे वर्ग करुन मुळाशी जावुन जलद तपास करण्याचे आदेश दिले . त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त श्री . प्रशांत अमृतकर , ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे व सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख यांनी अटक आरोपींकडे कसुन तपास करुन त्यांनी विक्रीकरिता आणलेले व लपवून ठेवलेले आणखी ०३ गावठी पिस्टल व ०७ जिवंत कारतुसे जप्त केली .

आरोपींकडे केलेल्या तपासात त्यांनी सदरची अग्निशस्त्रे ही त्यांचे अकोला येथिल एका मित्राचे मदतिने बुन्हाणपुर जिल्हा मध्यप्रदेश येथुन विकत आणल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच सपोनि देशमुख हे त्यांचे पथकासह रवाना होवुन त्यांनी शस्त्रे विकत घेण्यास मदत करणारा आरोपी नामे मंगलदास ऊर्फ मुन्ना रुपलाल धुत , वय -३५ वर्षे , रा – नवीन वस्ती , कुरणखेड – काटेपुर्णा , तालुका / जिल्हा अकोला यास ताब्यात घेवुन सदर आरोपींना अग्निशस्त्रे विक्री करणारा मध्य प्रदेश येथिल आरोपी नामे अनिल जामसिंग ससोदे , वय -३५ वर्षे , रा – ग्राम – जामने , तहसिल – खकनार , जि – बुन्हाणपुर , राज्य – मध्य प्रदेश याच्या त्याचे राहते परिसरात जावुन मुसक्या आवळल्या .

आरोपी अनिल ससोदे याचेकडे केलेल्या तपासाल त्याचा साथिदार पाहिजे आरोपी नामे रॉबिंगसिंग ऊर्फ गुलाबसिंग ऊर्फ अप्पु महेंद्रसिंग रा.पचोरी ता.खकनार जि – बुन्हाणपुर , राज्य – मध्य प्रदेश हा सदर परिसरातिल घनदाट जंगलात अग्निशस्त्रे बनवितो व अनिल ससोदे पुढे त्याची विक्री करतो असे निष्पन्न झाले असुन रॉबिंगसिंग ऊर्फ गुलाबसिंग ऊर्फ अप्पु महेंद्रसिंग हा फरार झाला असुन त्याचा शोध सुरु आहे . सदर आरोपी नामे अनिल ससोदे याने आरोपी नामे मंगलदास उर्फ मुन्ना याचे मदतिने विदर्भातिल अमरावती व अकोला परिसरात अनेकांना अग्निशस्त्रे विक्री केल्याचे आढळुन आले असुन त्याबाबत आणखी तपास सुरु आहे.तसेच आरोपी नामे रविंद्र औटे व प्रविण उगले यांचे मदतिने पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यात अग्निशस्त्रे विक्री करुन व्यवसाय वाढविण्याचा त्यांचा मानस होता .

आरोपी प्रविण बळीराम उगले , वय -३६ वर्षे , रा- मरकळ चौक , आळंदी , ता – खेड , जि – पुणे याचे वर दुखापत करुन जबरी चोरी तसेच मारामारीचे मिळुन एकुण ०६ गुन्हे दाखल आहेत . आरोपी नामे रविंद्र सुधाकर औटे , वय -३४ वर्षे , रा – दादा मुंगसे यांची बिल्डींग , खोली नंबर ४० , रासेगाव , ता – खेड जि – पुणे याचे वर वाकड पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे .

आरोपी मंगलदास ऊर्फ मुन्ना रुपलाल धुत , वय -३५ वर्षे , रा – नवीन वस्ती , कुरणखेड – काटेपुरना , ता . जिल्हा – अकोला हा नुकताच त्याने विक्री केलेल्या एका अग्निश्त्राचा वापर होवुन पातुर पोस्टे अकोला जिल्हा येथे घडलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातुन जामिनावर बाहेर आला आहे , आरोपी अनिल जामसिंग ससोदे , वय -३५ वर्षे , रा – ग्राम – जामने , तहसिल – खकनार , जि – बुन्हाणपुर , राज्य मध्य प्रदेश यास अद्याप पर्यंत कोठेही अटक झाली नाही . सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त , गुन्हे आनंद भोईटे

सहा . पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा , युनिट -४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे , सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख , सहा.पो.उप.नि. धर्मराज आवटे , दादाभाऊ पवार , पोहवा / प्रविण दळे , नारायण जाधव , संजय गवारे , अदिनाथ मिसाळ , राहिदास आडे , पोना / तुषार शेटे , लक्ष्मण आढारी , मो . गौस नदाफ , वासुदेव मुंडे , संतोष असवले , पोशि / शावरसिध्द पांढरे , प्रशांत सैद , सुनिल गुट्टे , तुषार काळे , सुरेश जायभाये , अजिनाथ ओंबासे , धनाजी शिंदे , सुखदेव गावंडे , गोंविद चव्हाण , आणि तांत्रिक विश्लेषन विभाग गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार , सहा.पो.उप.नि राजेंद्र शेटे , पोहवा / नागेश माळी , पोशि / पोपट हुलगे यांनी केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!