Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड प्रभाग क्र.३१ ‘नवी सांगवी-पिंपळे गुरव’ व ३२ ‘सांगवी’ च्या दुर्गा विसर्जनाचा मनपाच्या सहकार्याने आगळावेगळा उपक्रम!

महाराष्ट्र 14 न्यूज : संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच पिंपरी चिंचवड शहरावर आलेले कोरोनाचे संकट पाहता यंदाच्या नवरात्रौत्सव कालावधीत सर्व शहरवासियांनी आपली व इतरांची काळजी घेवून हा उत्सव साजरा करावा यासाठी तसेच दुर्गा विसर्जनाबाबत ( घट विसर्जन ) मनपाने दिलेल्या सुचनांचे पालन करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यंदा दुर्गा विसर्जन घाटावर न करता पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने प्रभाग क्रमांक ३१ व ३२ नवी सांगवी, सांगवी परिसरातील दुर्गा विसर्जन ( घट विसर्जन ) निर्माल्य ची सोय बॅडमिंटन हॉल (P W D ग्राऊंड ) सांगवी – नवी सांगवी या ठिकाणी करण्यात आली आहे.

Google Ad

तसेच म.न.मा.मार्फत सकळी ९ .०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत चौका चौकात दुर्गा मुर्ती ( घट ) निर्माल्य संकलनसाठी एका फिरत्या वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे घाटावर गर्दी करू नी असे आवाहन पिंपरीचिंचवड महानगरपालिके मार्फत करण्यात आले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!