Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

“मी घेतली कोरोना प्रतिबंधक लस, … त्या नंतर मला कोणताही त्रास होत नाही” … पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त ‘श्रावण हर्डीकर’

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. १० फेब्रुवारी २०२१ ) : कोरोना प्रतिबंधात्मक लस मी आज स्वत: घेतली आहे.  त्यानंतर मला कोणताही त्रास होत नसून ही लस सुरक्षित आहे अशी प्रतिक्रिया श्रावण हर्डीकर यांनी दिली. पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयामध्ये आयुक्त हर्डीकर यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले पहिल्या टप्प्यामध्ये सर्वप्रथम वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना लसीकरण करण्यात आले असून दुस-या टप्प्यामध्ये शहर पातळीवर काम करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी, शासकीय तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांना लस देण्याचे काम सुरु आहे.  तसेच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिक आतूरतेने वाट पहात असलेली कोरोना प्रतिबंधात्मक लस यांना लवकरच उपलब्घ करुन देणार असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!