Google Ad
Editor Choice india Technology

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल ? जाणून घ्या नव्या फिचरची स्टे बाय स्टेप माहिती

महाराष्ट्र 14 न्यूज : भारतात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आधारित व्यहारांचे प्रमाण वाढलं आहे. फोन पे (PhonePe), गुगल पे (Google Pay), पेटीएमसारख्या (Paytm) युपीआय आधारित अॅप्सचा देशात मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यांना टक्कर देण्यासाठी आता व्हॉट्सअॅप मैदानात उतरलं आहे. व्हॉट्सअॅपवरुन (Whatsapp) आता पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. नुकतीच व्हॉट्सअ‍ॅपला भारतात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

व्हॉट्सअॅपने जून महिन्यामध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सुरु केली आहे. तसेच काही व्हॉट्सअॅप युजर्ससाठी ही सेवा उपलब्ध होती. याद्वारे कंपनीने त्यांची पेमेंट सेवा गेल्या काही महिन्यात तपासून पाहिली. लवकरच ही सेवा सर्वांना मिळणार आहे. NPCI ने सध्या काही मोजक्या मोबाईल क्रमांकासाठी व्हॉट्सअॅप मनी ट्रान्सफरची सेवा वापरण्याची परवानगी दिली आहे. लवकरच ही मर्यादा वाढवली जाणार आहे. NPCI कडून “WhatsApp पेमेंट सिस्टिमसाठी Go Live ची परवानगी देण्यात आली आहे.

Google Ad

भारतात WhatsApp चे 400 मिलियनपेक्षा (40 कोटी) अधिक युजर्स आहेत. सुरुवातीला त्यापैकी केवळ 20 मिलियन युजर्सना (दोन कोटी ग्राहक) व्हॉट्सअॅपची पेमेंट सुविधा वापरता येईल. तसेच काही कालावाधीत ही मर्यादा वाढवली जाईल आणि लवकरच ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध होईल.

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल? (तुमचं व्हॉट्स्ॅप अद्याप अपडेट झालेलं नसेल तर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्याचा ऑप्शन दिसणार नाही.)
Step 1. Whatsapp ओपन केल्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या 3 डॉट्स वर क्लिक करा.
Step 2. तिथे असलेल्या Settings section वर क्लिक करा

Step 3. Settings ओपन केल्यावर Payments चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा
Step 4. त्यानंतर Whatsapp तुम्हाला Bank Account link करण्यास सांगेल. (तेच अकाऊंट लिंक करा ज्या अकाऊंटशी लिंक्ड सिमकार्ड तुमच्या मोबाईलमध्ये अॅक्टिव्हेट असेल, तसेच तुमचं व्हॉट्सअॅप अकाऊंट त्याच नंबरशी लिंक्ड असेल.)

Step 5. Bank Account link करताना Whatsapp तुम्हाला काही नियम आणि अटींवर (Terms & Conditions) Agree करण्यास सांगेल. तुम्ही I agree बटणावर क्लिक करु शकता अथवा मागच्या मेनू मध्ये जाऊ शकता.
Step 6. Terms & Conditions स्वीकारल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर Verify करावा लागेल. इथून पुढे यूपीआय (UPI) व्हेरिफिकेशनला सुरुवात होईल.

Step 7. मोबाईल नंबर व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला विविध बँकांच्या नावांची यादी दिसेल. त्यापैकी तुम्हाला तुमची बँक निवडायची आहे.
Step 8. त्यानंतर व्हॉट्सअॅप तुम्हाला VPA म्हणजेच Virtual Payee Address बनवण्यास सांगेल, तुम्ही त्यावर क्लिक करा, VPA तयार होईल.
Step 9. व्हॉट्सअॅप तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डवरील शेवटचे सहा अंक विचारेल. तसेच इतरही काही माहितीची मागणी केली जाईल (डेबिट कार्डवरील एक्सपयरी डेट, तुमची जन्मतारीख इत्यादी)
Step 10. त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअॅपवरील मनी ट्रान्सफर हे फिचर वापरु शकता

Google Ad

About the author

Maharashtra14 News

25 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!