Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : आरोग्यमंत्र्यांनी निश्चित केले नवे दर … कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त – जाणून घ्या, काय आहेत नवे दर!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना व्हायरस आता कमी प्रमाणात होत असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र अजुनही लोकांच्या मनात कोरोना घर करून बसला आहे. कोरोना चाचणी म्हटलं की तरी काळीज घाबरतं. त्यात चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा लुबाडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी समोर येत होत्या. अशातच आरोग्यमंत्र्यांनी चाचणीच्या दरात २०० रूपयांनी कपात केली आहे.

राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर प्रति तपासणी सुमारे २०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी ९८०, १४०० आणि १८०० रुपये असा कमाल दर आकारणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आलं असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

Google Ad

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात असून प्रती दहा लाख लोकसंख्येमागे ७० हजार चाचण्या केल्या जात असून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, कोरोना चाचणीच्या दरात चौथ्यांदा घट करण्यात आली आहे. सामान्य माणूस केंद्र स्थानी ठेवून राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट केली असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

21 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!