महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० ऑगस्ट) : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराचं वातावरण फार बदललं आहे. शिक्षणाचं माहेरघर समल्या जाणाऱ्या पुण्याची नाईट लाईफ बदलली आहे. पार्ट्या आणि पबिंगकडे अनेक तरुणांचा कल दिसत आहे. नुकतेच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून एक मोठी कारवाईत करण्यात आली आहे. हि कारवाई एका उच्चभ्रू सोसायटीत असणाऱ्या सदनिकेवर करण्यात आली आहे.
या कारवाईत जुगाराचे साहित्य, हुक्क्याची सुगंधी तंबाखू, मोबाइल संच असा पाच लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हडपसर भागातील अमानोरा पार्कमधील एका सदनिकेत काहीजण पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.
पोलिसांच्या पथकाने सापळा लावून सदनिकेत छापा टाकला. पोलिसांनी सदनिकेतून दहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४१ हजार रुपयांची रोकड, १४ हजार रुपयांची हुक्क्याची सुगंधी तंबाखू, जुगाराचे साहित्य असा पाच लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या दहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, राजेंद्र कुमावत, तुषार भिवरकर, सागर केकाण, अमेय रसाळ, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ आदींनी ही कारवाई केली.
वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड २४ ऑगस्ट (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…