Google Ad
Uncategorized

पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत जुगार अड्डा…; जुगार अन हुक्क्याच्या साहित्यासह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० ऑगस्ट) : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराचं वातावरण फार बदललं आहे. शिक्षणाचं माहेरघर समल्या जाणाऱ्या पुण्याची नाईट लाईफ बदलली आहे. पार्ट्या आणि पबिंगकडे अनेक तरुणांचा कल दिसत आहे. नुकतेच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून एक मोठी कारवाईत करण्यात आली आहे. हि कारवाई एका उच्चभ्रू सोसायटीत असणाऱ्या सदनिकेवर करण्यात आली आहे.

या कारवाईत जुगाराचे साहित्य, हुक्क्याची सुगंधी तंबाखू, मोबाइल संच असा पाच लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हडपसर भागातील अमानोरा पार्कमधील एका सदनिकेत काहीजण पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

Google Ad

पोलिसांच्या पथकाने सापळा लावून सदनिकेत छापा टाकला. पोलिसांनी सदनिकेतून दहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४१ हजार रुपयांची रोकड, १४ हजार रुपयांची हुक्क्याची सुगंधी तंबाखू, जुगाराचे साहित्य असा पाच लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या दहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, राजेंद्र कुमावत, तुषार भिवरकर, सागर केकाण, अमेय रसाळ, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ आदींनी ही कारवाई केली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!