Google Ad
Editor Choice Pune District

दौंड तालुक्यातील गालांडवाडी ग्रामपंचायत सातव्यांदा झाली बिनविरोध … गावातील प्रतिष्ठित मंडळींच्या सहभागाला यश!

महाराष्ट्र 14 न्यूज : दौंड तालुक्यातील गलांडवाडी ग्रामपंचायत स्थापनेपासुन आतापर्यंत सातव्यांदा बिनविरोध झाली आहे. आमदार राहुल कुल कुल व माजी आमदार तसेच पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात गटातटाच्या पार्श्र्वभूमीवर स्थानिक पातळीवर किरकोळ राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध केली.

गालांडवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळीनी महत्त्वाचा सहभाग घेतला, यात कात्रज दूध संघाचे संचालक नीळकंठ शितोळे, पोपटराव शिंदे, बाजार समितीचे संचालक उत्तमराव ताकवले, ज्ञानदेव कदम, संजय कदम, खंडेराव कदम, डॉ. राजेंद्र कदम, पोलिस पाटील बाळासाहेब कदम, बाळासाहेब शितोळे, अरुण कदम, उमेश देवकर, मोहन शेलार, बाळासाहेब भापकर, विजय पवार, गोरख मांढरे, पोपटराव कदम आदी गाव पुढाऱ्यांनी प्रयत्न केले.

Google Ad

बिनविरोध निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे-
प्रभाग 1- वर्षा प्रमोद देवकर, प्रकाश शरद शेलार, रेश्मा सुमित चव्हाण. प्रभाग 2- गजानन विठ्ठल कदम, गौरव पोपट चव्हाण, कल्पना संजय जाधव.
प्रभाग 3 -रमेश बबन पासलकर, सुनंदा संजय पवार, जयश्री अक्षय थोरात.
बिनविरोध निवडीनंतर दौंड तहसीलदार कार्यालयासमोर सर्व सदस्य व गावातील दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विजयोत्सव जल्लोषात साजरा केला, आणि सर्वांचे आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!