Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

अखेर ‘राजेश पाटील’ झाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवे आयुक्त … श्रावण हर्डीकर यांची बदली!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी ओडिसा केडरचे राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रावण हर्डीकर यांच्या बदलीची चर्चा मागील काही दिवसांपासून होती. मात्र कोरोना काळात चांगली कामगिरी केल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर मागील महिन्यात त्यांना बढती मिळाली होती. अखेर श्रावण हर्डीकर यांची आज (शुक्रवार) पुणे येथील नोंदणी महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली.

पिंपरी चिंचवड आयुक्त पदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. मात्र आज राजेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राजेश पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासातील असल्याचे बोलले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Google Ad

सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत फेब्रुवारी 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त असलेले श्रावण हर्डीकर यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्तपदी नियुक्ती केली होती.

आयुक्त राजेश पाटील यांचा थोडक्यात परिचय :-

मूळचे एरंडोल तालुक्यातील रहिवासी, तरूणाईचे आयकॉन तथा सध्या ओडिशा राज्यातील आयएएस कॅडरचे अधिकारी राजेश पाटील यांची प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात बदली करण्यात आली असून ते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार सांभाळणार आहेत. राजेश प्रभाकर पाटील (IAS) यांची जीवनकथा ही लक्षावधी तरूणांसाठी प्रेरणादायी बनली आहे. त्यांचे पालक हे शेतमजूर होते. तर शिकत असतांना राजेश पाटलांना पाव व भाजी विक्रीचे काम करावे लागले. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यानंतर त्यांनी जिद्दीने पुढील शिक्षण पूर्ण केले. २००५ सालच्या युपीएससी परिक्षेत त्यांनी यश संपादन करून भारतीय प्रशासनीक सेवा अर्थात आयएएसमध्ये प्रवेश केला.

स्टॅटेस्टिकल सर्व्हिसेसमध्ये राजेश यांची निवड झाली होती. पण, त्यांना आयएएस अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली मेहनत सोडली नाही. २००५मध्ये ते यूपीएससी पास झाले आणि त्यांची पहिली नियुक्ती ओडिशातील कोटापूरमध्ये अठगढ येथे विभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून झाली. ओडिशामध्ये काम करताना २००८मध्ये महा नदीला पूर आला होता. त्यावेळच्या बचाव कार्यात राजेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. राजेश यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राजेश यांनी आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन केले असून, ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे त्यांचे पुस्तक खूप लोकप्रिय आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!