Google Ad
Editor Choice Pune District

Alandi : आळंदीत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेस नागरिकांचा उत्साही प्रतिसाद … प्रशासनास स्थानिक नागरिक, पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य!

महाराष्ट्र 14 न्यूज : येथील आळंदी नगरपरिषदेने शासनाच्या धोरणा प्रमाणे माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमांतर्गत आळंदी नगरपरिषदेच्या ९ प्रभागात एकाच वेळी सुमारे ८ हजार घर भेटीतून आरोग्य तपासणी मोहीम सुरु केली. या मोहिमेत सुमारे ४५ प्रशिक्षित आरोग्य सेवकांची पथके तयार करून सुमारे ११२ प्रशिक्षित शिक्षक,कर्मचारी व आरोग्य वैद्यकीय सेवक कर्मचारी यांचे विशेष सहकार्य घेत घर भेटीच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु केली. या मोहिमेत पदाधिकारी व नागरिकांनी उत्साही प्रतिसाद दिल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.

या मोहिमेत घरोघरी जाऊन सर्व नागरिकांनी ऑक्सिमीटर व ताप तपासणी यंत्राचे साहाय्याने नागरिकांची ऑक्सिजन व ताप  या बाबत तपासणी करण्याचे काम सुरु करण्यात आले. यासाठी सर्व सेवकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. खेडच्या तहसिलदार सुचित्रा आमले यांनी यावेळी प्रत्येक्ष कामाची पाहणी करून सेवकांना मार्गदर्शन केले. घर भेटीचे परिसरात जाऊन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचेसह स्थानिक नगरसेवक सागर बोरुंदीया,प्रकाश कुऱ्हाडे, सागर भोसले,सुनीता रंधवे,स्नेहल कुऱ्हाडे,गटनेते पांडुरंग वहिले,सचिन गिलबिले,माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे,नगराध्यक्षा वैजयंता उमार्गेकर यांनी आपापल्या भागात नागरिकांचे आरोग्य तपासनीत सहभागी होऊन नागरिकांना आरोग्य तपासणी करण्यास आवाहन केले.

Google Ad

माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या धोरणा प्रमाणे आळंदीत उपक्रम राबविण्यात आला. यास नागरिक,पदाधिकारी व स्थानिक स्वयंसेवी संस्था यांनी विशेष सहकार्य करीत मोहिमेच्या पहिल्या दिवशी प्रभावी घर भेटीतून आरोग्य तपासणी करण्यात आली. आळंदी शहरात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानाची अंमलबजावणी करण्यात मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी विशेष परिश्रम घेत संजय तेली व तहसीलदार सुचित्रा आमले यांचे मार्गदर्शनात नियोजन करून आणीत मोहीम राबविण्यात आली. यास शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र शासनाने हे अभियान सुरू केले आहे. या अभियानात आळंदी शहरातील नागरिकांनी तपासणी करून घेण्यास स्वतः पुढे आल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. आळंदी प्रशासनाच्या मदतीला आळंदीतील शिक्षक,पदाधिकारी व नागरिकांनी धावून जात आळंदी कोरोनामुक्त शहर करण्यासाठी आरोग्य तपासणी अभियान यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे.
या अभियानात शहरातील ९ प्रभागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन गृह भेटी देत जनजागृती देखील केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.

जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना समाजात वावरत असताना पूर्णवेळ मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी आळंदीत डॉक्टरांची टीम व प्रशासन काम करीत आहे. या वेळी लोकांना मास्कचा शास्त्रशुद्ध पद्धतीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले .
आळंदी शहरातील आरोग्य विषयी काम करणाऱ्या संस्था, संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे , असे आवाहन नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

208 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!