महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ जानेवारी) : ‘’राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वत:’’ असे ब्रिद घेवून भारतीय जनता पार्टीचे काम करणारे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, बाबुराव पाचर्णे यांच्यासह माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘‘इंद्रायणी थडी’’ महोत्सवात पक्ष निष्ठेचे प्रेरणास्थळ साकारण्यात येणार आहे.भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील गावजत्रा मैदानावर दि. २५ ते दि. २९ जानेवारी २०२३ दरम्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठा ‘इंद्रायणी थडी-२०२३’ महोत्सव आयोजित केला आहे.
तब्बल १७ एकर जागेत संपूर्ण महाराष्ट्रातील १ हजार स्टॉल उभारण्यात आले आहेत. महोत्सवामध्ये अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृती, ग्राम संस्कृती, खाद्य महोत्सव, बाल जत्रा, परंपरिक खेळ, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, पाटील वाडा प्रतिकृती, भजन महोत्सव, मर्दानी खेळ, विविध भागातील कलाकृती आणि हस्तकला प्रदर्शन, खेळ रंगला पैठणीचा, मंगळगौर खेळ यासह फॅशन शो, महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर, सिनेतारका नृत्य, पारंपरिक नृत्य, जादूचे प्रयोग, झुंबा डान्स अशा विविध कार्यक्रम एकाच छताखाली उपलब्घ आहेत.यासह आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर आणि बेरोजगार तरुणांना संधी देण्यासाठी नोकरी महोत्सवसुद्धा होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या सहकार्याने नियोजन केले आहे. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच ०३ जानेवारी रोजी निधन झाले. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात जगताप यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. तसेच पक्ष हितकरिता ही त्यांचे योगदान उभ्या महाराष्ट्रात सर्वांनी पाहिले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या घराण्यातील आमदार मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौरपद भूषवले आहे. कसबा मतदार संघ पुण्याच्या विकासात त्यांचे योगदान राहीले आहे.
मावळ विधानसभा मतदार संघातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिगंबर भेगडे आणि शिरुर मतदार संघातील माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचेही निधन झाले. या दोन्ही नेत्यांनी ग्रामीण भागात भाजपा वाढवण्यासाठी योगदान दिले आहे. यासह आमदार जगताप आणि टिळक यांनी नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत आजारी असतानाही व्हीलचेअरद्वारे मतदानासाठी विधान भवनात पोहोचले होते. त्यावेळी ‘‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वत:’’ अशी शिकवण आम्हाला आमचा पक्ष देतो. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्र आणि पक्षाशी निष्ठा ठेवलेल्या या नेत्यांचे स्मरण ‘इंद्रायणी थडी-२०२३’ महोत्सवास येणाऱ्या नागरिक, कार्यकर्त्यांना व्हावे, यासाठी पक्ष निष्ठा प्रेरणास्थळ साकारण्यात येत आहे, अशी माहिती महोत्सवाचे समन्वयक संजय पटनी यांनी दिली.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…