महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ फेब्रुवारी : इंडियन मेडीकल असोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी शाखा (IMA PCB) व पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभाग यांचे संयुक्त प्रयत्नातून असंसर्गजन्य आजार व “आपले आरोग्य जाणून घ्या” या संकल्पनेतून मोफत आरोग्य तपासणी अंतर्गत रक्तदाब,वजन रक्तातील साखर तसेच महिलां करीता गर्भाशय व स्तन कर्करोग स्क्रीनींग मॅमोग्राफी शिबीर दिनांक ०६ फेब्रुवारी रोजी पिंपळे गुरव दवाखाना येथे आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबीरात सुमारे १५६ लाभार्थ्यांचे रक्तातील साखर व रक्तदाबतपासणी करणेत आली.तसेच ३५ महिलांची गर्भाशय कर्करोग व ४४ महिलांची स्तन कर्करोग स्क्रीनींग मॅमोग्राफी करणेत आली. सदर उपक्रमाचे ऊदघाटन डाॅ. जयश्री शेलार वैद्यकिय अधिकारी पिंपळे गुरव दवाखाना व डाॅ. रितु लोखंडे प्रसिद्ध रेडिओलाॅजिस्ट सहसचिव IMA PCB यांच्या हस्ते करणेत आले,सदर प्रसंगी डाॅ प्रकाश रोकडे खजिनदार IMA PCB व अध्यक्ष प्रज्ञादीप सोशल फाऊंडेशन,डाॅ मिलिंद सोनावणे सचिव IMAPCB हजर होते.
पिंपळे गुरव दवाखान्याचे सर्व अधिकारी, नोडल अधीकारी डॉ. वैशाली भांबरे, डॉ. सुशांत कदम, आशा सेविका, कर्मचारी वर्ग, परिसरातील लाभार्थी यावेळी हजर होते. ऊदघाटन प्रसंगी डाॅ प्रकाश रोकडे व डाॅ. रितु लोखंडे यानी महिला गर्भाशय व स्तन कर्करोग याबद्दल माहिती प्रतिबंधक व ऊपारात्मक उपाययोजनांबाबत सर्वंकष माहीती देऊन आहार दिला तसेच ऊपस्थितीत लाभार्थ्यांच्या प्रश्नांचे शंकानिरसन केले.
हा ऊपक्रम कार्यक्रम यशस्वीरित्य राबविणे करीता करणे करीता पिंपळे गुरव दवाखान्याच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री शेलार, डाॅ. प्रकाश रोकडे प्रज्ञादीप सोशल फाऊंडेशन पिंपळे गुरव ,Oncolife हॉस्पिटल तळेगाव दाभाडे अधिकारी कर्मचारी यांचे मोठे सहकार्य लाभले तसेच हेल्थ विदईन रिच फाऊंडेशन यांच्या वतीने मॅमोग्राफी करणे करीता अधिकारी कर्मचारी वर्ग व सुस्ज्ज वाहन उपलब्ध करून देण्यात आले.
वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड २४ ऑगस्ट (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…