Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड मधील आक्रमक राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे कितीही फिरले, तरी ते कसे फिरवायचे याची चावी पवारांच्या हाती…!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ जानेवारी) : दोन दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने चिंचवडची पोटनिवडणूक घड्याळ या पक्षचिन्हावर लढण्याचा ठराव केला आहे. त्यातून भाजपला बाय देण्याचा त्यांचा मनोदय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फक्त आता यावर राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींची भूमिका काय राहते, याकडे चिंचवडच नाही, तर संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. परंतु आ. अण्णा बनसोडेंनी व्यक्त केलेल्या भावनेचा आदर आहे, असे सांगतानाच पंढरपूरला वेगळा न्याय आणि चिंचवडला वेगळा न्याय असे होत नाही, असे स्पष्ट करीत काटेंनी बनसोडेंच्या मताशी असहमती दर्शवली. परंतु काहीही असो पिंपरी चिंचवड च्या घड्याळाचे काटे कसे फिरवायचे याची चावी दादा-साहेब पवारांकडे आहे हे वेगळे सांगायला नको…!

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागलेल्या चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जगताप कुटुंबातील उमेदवार असेल, तर ही निवडणूक बिनविरोध करावी, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी काल (ता.२१) मांडली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटातटाचे मोठे वादंग दिसायला लागले आहे. तर सोशल मीडियावर “कपटी मित्रापेक्षा, दिलदार शत्रू बरा” ..! अशी पोस्ट व्हायरल व्हायला लागली आहे.

या पोटनिवडणुकीच्या निकालाचे पडसाद थेट आगामी होऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीवर पडणार असल्याने ती कुठल्याही परिस्थितीत लढविण्य़ाचा चंग शहर राष्ट्रवादीने बांधलेला आहे. पालिकेतील पराभवाचा बदला घेतल्याशिवाय तो आता शांत बसणार नाही. आता फक्त लढायचे आणि जिंकायचे हेच ध्येय आमच्यापुढे आहे, असा निर्धार व्यक्त करतानाच दुसरीकडे मात्र, पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्यानुसार आम्ही काम करू, असेही काटे यांनी प्रसिद्धीपत्रकात शेवटी म्हटले आहे.

आता यावर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात हे लवकरच स्पष्ट होईल, की ही सर्व बडबड आणि धडपड वायफळ ठरतेय का? मात्र तत्पूर्वी या इच्छुकांच्या भाऊगर्दीत उमेदवारीसाठी नेमकी कोणाची लॉटरी लागणार? हे सुद्धा पाहाणे तेवढेच मनोरंजक ठरणार हे मात्र नक्की. कारण पिंपरी चिंचवडच नव्हे तर राज्यातील राष्ट्रवादी ची सूत्रे कुठून फिरतात हे जनता जाणते, त्यामुळे देखो आगे आगे होता है क्या ..?

स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी नेहमीच कार्यकर्त्यांवर भरभरून प्रेम केले. प्रत्येकसंकटात वेळोवेळी ते कार्यकर्त्यांमागे मोठ्या भावाप्रमाणे  खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबाइतकेच सर्वसामान्य कार्यकर्त्याचेही कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मागे त्यांच्या कुटुंबियांसोबत कायम एकनिष्ठ राहू, अशी भूमिका चिंचवड मधील त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटूंबियांवर प्रेम करणाऱ्या पक्षातील आणि पक्षाबाहेरील कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबास म्हणजेच भारतीय जनता पक्षाला मोठी ताकद मिळाल्याचे दिसत आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

4 days ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

4 days ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

3 weeks ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

3 weeks ago

“खड्डा दिसला तर फोटो काढा, ठिकाण नोंदवा” … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आतापर्यंत २,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजविले; उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

  महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…

4 weeks ago