Categories: Uncategorized

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी झालेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आग्रही  भूमिका घेत त्यांनी एनसीएल पाषाण उपकेंद्र ते महावितरणच्या औंध कर्मचारी वसाहतीपर्यंत उच्च क्षमतेची (२२ के.व्ही.३०० स्क्वेअर मिमी) नवीन वीज वाहिनी टाकण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी आमदार शंकर जगताप यांनी केली.  या मागणीला बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 

पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीमध्ये चिंचवड मतदार संघातील अनियमित वीजपुरवठ्यावरून आमदार शंकर जगताप यांनी आग्रही  भूमिका घेतली. या बैठकीत बोलताना आमदार जगताप म्हणाले,  चिंचवड मतदार संघातील जुनी सांगवी परिसरात अनेक ठिकाणी अखंडीत विद्युत प्रवाह होत असल्याने वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. जुनी सांगवी परिसरात अनेक ठिकाणी व्होल्टेज चढ-उतार आणि केबल बिघाडाच्या घटना घडत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला.  विशेषतः या भागातील पवार नगर परिसरात २७ जुलै २०२५ रोजी विद्युत प्रवाह अचानक वाढल्याने अनेक घरांतील टीव्ही, फ्रिज व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले.

या पार्श्वभूमीवर एनसीएल पाषाण उपकेंद्र ते महावितरणच्या औंध कर्मचारी वसाहतीपर्यंत (सुमारे २.५ किमी) २२ के.व्ही., ३०० स्क्वेअर मिमी क्षमतेची नवीन उच्च दर्जाची व सुरक्षित वीज वाहिनी टाकण्याची मागणी आमदार शंकर जगताप यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली आहे. सद्यस्थितीत असलेली मुख्य केबल जुनी व तांत्रिकदृष्ट्या कमकुवत झाली असून अनेक ठिकाणी जॉइंट्स असल्यामुळे वारंवार बिघाड होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. नवीन उच्च क्षमतेची केबल टाकण्यात आल्यास वीज पुरवठा सुरळीत आणि योग्य दाबाने होईल. तसेच स्पार्किंग, आग किंवा जीवितहानीचा धोका टळून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.
————————

चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या “जुनी सांगवी परिसरातील वीज समस्येबाबत डीपीडीसी बैठकीत मांडलेल्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औंध कर्मचारी वसाहत दरम्यान २२ के.व्ही. नवीन केबल टाकण्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत प्रशासनाने सहकार्याची भूमिका दर्शवली आहे.हे काम लवकरच मार्गी लागणार असून , नागरिकांना अखंडित व सुरक्षित वीज पुरवठ्याचा दिलासा मिळणार आहे.

शंकर जगताप
आमदार, पिंपरी चिंचवड

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago