Categories: Editor Choice

चिंचवडचे स्व. आमदार लोकनेते ‘लक्ष्मण जगताप’ यांना गोभक्तांची अनोखी श्रध्दांजली … लोटे परशुराम गोशाळेत होम हवन व श्रींचा अभिषेक गोपुजन अभिषेक संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ जानेवारी २०२३) : चिंचवडचे दिवंगत आमदार गोभक्त स्व. लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रध्दांजली म्हणून होम हवन व श्रींचा अभिषेक गोपुजन कार्यक्रम अभिषेक सोहळा गोशाळा संस्थापक कर्मवीर श्री.ह.भ.प. भगवान कोकरे महाराज (अध्यक्ष महाराष्ट्र वारकरी महामंडळ रत्नागिरी जिल्हा) यांच्या वतीने आज दि. २२ जानेवारी २०२३ रोजी, स. ११.०० वा. श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान संचलित भक्ती शक्ती दाता दास हनुमान गोशाळा लोटे, परशुराम ता. खेड, रत्नागिरी येथे करण्यात आला.

या कार्यक्रमास संजयजी पांड्ये (अध्यक्ष), महेश गोवळकर ( उपाअध्यक्ष), कार्याध्यक्ष गौरव गोविंदजी मुंदडा, ह.भ.प. श्री. भगवान कोकरे महाराज, दिपकजी ओकटे (सेक्रेटरी), विठ्ठलदास मुंदडा (सदस्य), प्रकाशजी पोफळे, सचिन आंग्रे , सचिन काते, राजेश पुरूषोत्तम पल्लोड, कोंडू विठू खरात, सुधाकर बगडे, गणेश गावडे, पंकज गावडे, रामदास कस्पटे, राजू नागणे, संदीप दरेकर व अनेक गोभक्त या कार्यक्रमात उपस्थित होते.

श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान गोशाळा गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या ठिकाणी १०६५ गायींचे संगोपन आणि पालन करण्यात आले आहे. या गोशाळेकरीता लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनेक वेळा चाऱ्याच्या माध्यमातून मदत केली आहे, आणि आजही त्यांचा मित्र परिवार यांच्या वतीने पाच टन गोळी पेंढ पशूखाद्य आज देण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप यांना गोमतेची सेवा करण्याची आवड होती आजही त्यांच्या शेतात गाईंचा गोठा असून ते स्वतः या गाईना चारा खायला घालत देखभाल करत आणि तिची धारही ते स्वतः काढत, त्यामुळे त्यांच्या मागे त्यांचा संपूर्ण परिवार ही सेवा आजही करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणूनच त्यांना श्रध्दांजली म्हणून आज त्यांच्या मित्र परिवाराच्या आणि गोभक्तांच्या वतीने चारा देऊन लोटे परशुराम खेड, रत्नागिरी या ठिकाणी होम हवन व श्रींचा अभिषेक गोपुजन कार्यक्रम अभिषेक सोहळा गोशाळा संस्थापक कर्मवीर श्री.ह.भ.प. भगवान कोकरे महाराज (अध्यक्ष महाराष्ट्र वारकरी महामंडळ रत्नागिरी जिल्हा) यांच्या वतीने करण्यात आला.

या गोशाळेत सुमारे १०६५ गायींचे संगोपन उत्तम पद्धतीने केले जात आहे. यावेळी ह भ प भगवान कोकरे महाराज म्हणाले, “चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे कार्य आणि योगदान खूप मोठे आहे, गोमाता हे ३३ कोटी देवदेवतांचे निवासस्थान आहे, ज्यांच्या सेवेने माणसाचे आयुष्य पार पडते. कुटुंबात सुख, समृद्धी आणि आनंद नांदतो. आपल्या जीवनात या गोष्टी अंमलात आणून गोमातेच्या सेवेसाठी भाऊंच्या सारखे सर्वांनी पुढे यावे, गायींची सेवा करणे हे गुणवत्तेचे काम आहे. आज या गोशाळेत असलेल्या या गोमातेला पाहून अनेकांना आनंद होत आहे, तो लक्ष्मणभाऊंच्यामुळेच”!

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

4 days ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

2 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

2 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 month ago