Google Ad
Editor Choice Maharashtra

Lonawala : दुधाचा टॅंकर उलटून 50 फूट फरफटत , पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर थरार , एकाचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज : यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर बोर घाटात दुधाचा टँकर पलटी झाला. या दुर्घटनेत एक जण जागीच ठार झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला.

खंडाळा बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा दुधाचा टँकर पलटी झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टँकर पलटी होऊन जवळपास 50 फूट फरफटत गेला. या अपघातात मुंबईतील बाळासाहेब खोपडे या माथाडी कामगारांचा मृत्यू झाला.

Google Ad

टँकर पलटी झाल्याने मुंबईकडे जाणारी एक लेन काही काळ बंद करण्यात आली होती. यावेळी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल होऊन त्यांमी एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी हटवत टँकर बाजूला केला.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!