Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षाना स्मार्ट शहर नकोय का? पार्किंग धोरणाला का, होतोय विरोध …

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहर आता स्मार्ट सिटी कडे वाटचाल करत आहे. त्यामुळे शहरात प्रशस्त असे रस्ते झाले असून काही रस्त्यांची कामे चालू आहेत. आपले शहर अधिक सुंदर दिसावे हा प्रयत्न सत्ताधारी किंवा कोणीही असेल तर करणारच, त्यामुळे रस्त्याच्या कडेला होणारी वाहने पार्कींगची वाढती समस्या लक्षात घेऊन महापालिकेने १ मार्च पासून बीआरटीएस विभागाच्या मार्फत पार्किंग धोरण अवलंबविले जात आहे. या धोरणामध्ये शहरातील वाहन पार्कींगला शिस्त लागून वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार असुन रस्त्यांवर बेकायदेशीरपणे उभ्या असणाऱ्या वाहनांना आळा बसणार आहे.

Google Ad

पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या पाहता सद्यस्थितीत शहराच्या सर्वच भागामध्ये विशेषत: मोठ्या रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात अवजड व व्यावसायिक वाहने ट्रक, बसेस, ट्रेलर यासारखी वाहने दिवसेंदिवस उभी केलेली असतात. अशा रस्त्यावर नागरिकांना वावर करणे कठीण झाले आहे, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढुन वाहतुकीसाठी नेहमी अडथळा निर्माण होत असतो. खरे वास्तव पाहता या ठिकाणी सर्वसामान्यांची वाहने नसुन ती सर्व मोठी व व्यावसायिकांचीच असतात. याबाबतीमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या वाहने पार्कींग संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्यामुळे सर्वसामान्यांचे नुकसान होणार नाही सारे पार्कींग धोरण लागु करण्याचा निर्णय महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना घ्यावा लागला.

परंतु शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा या पार्किंग धोरणाला विरोध सुरु झाला आहे. तसे निवेदन आयुक्त राजेश पाटील यांना देण्यात आले आहे. खरतर या पार्कींग धोरणामध्ये मुळात मोठ्या रस्त्यांवर अवजड व व्यावसायिक वाहने ट्रक, बसेस, ट्रेलर यासारखी वाहने बिनदिक्कतपणे लावली जातात यात सर्वसमान्यांच्या गाड्या नसतात हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे.

याउलट पार्कींग धोरण लागु केल्यामुळे शहरातील वाढती वाहतुकीची समस्या दुर होवुन अनाधिकृतपणे पार्कींग केलेल्या वाहनामध्ये घडणारी गैरकृत्ये बंद होवुन वाहतुक सुरळीत होवुन वाहनांना शिस्त लागून पार्कींग धोरणामुळे मनपाच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष यांच्या कसे लक्षात येत नाही, असा प्रश्न सामान्य शहरवासीयांना पडला आहे. उलट पिंपरी चिंचवड शहर एकीकडे स्मार्ट होत आहे, ते अधिक कसे स्मार्ट करता येईल, याचा सर्वांनीच प्रयत्न करायला हवा, तसेच या पार्किंग धोरणात काही चांगले बदल करता येतात का? हे राष्ट्रवादी काँग्रेसने पाहिले पाहिजे.

पार्कींग धोरणाला विरोध करण्याचा केविलवाणा प्रकार राष्ट्रवादीकडुन केला जात असल्याचा आरोप सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला असून आता या विरोधाचा अभ्यास सत्ताधाऱ्यांनी सुरू केला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या विरोधामुळे शहर अध्यक्ष यांना आपले शहर स्मार्ट व्हायला नको का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे, हे मात्र नक्की …

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!