Google Ad
Editor Choice india

देवेंद्र फडणवीसांचा २३ वर्ष जुना रेकॉर्ड अखेर मोडीत निघणार … नक्की काय होणार ?

महाराष्ट्र 14 न्यूज : देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आहे. देवेंद्र फडणवीस वयाच्या 27 व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर झाले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस नागपूरच्या राम नगर वार्डमधून विजयी झाले होते. देवेंद्र फडणवीस राज्याच्या उपराजधानीचे महापौर झाले होते. मात्र त्यांचा हा रेकॉर्ड एक तरूणी मोडणार आहे.

केरळमध्ये नुकत्याच महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. तिरुवनंतपुरम महापालिकेत मुडवणमुगल वार्डातून आर्या राजेंद्रन ही 21 वर्षीय तरुणी विजयी आहे. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम या शहराच्या महापालिकेच्या महापौर म्हणून आर्या राजेंद्रन यांची निवड झाली आहे.

Google Ad

आर्या राजेंद्रननं महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर त्या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विक्रम मोडणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य आहेत. ऑल सेंटस कॉलेजमध्ये बीएस्सी मॅथ्सचे शिक्षण घेत आहेत. इंजिनीअरिंगच्या पदवीसाठी अभ्यास करत आहेत. दरम्यान, 1997  साली देवेंद्र फडणवीस नागपूर महापालिकेचे महापौर झाले होते. त्यासोबतच फडणवीस वयाच्या 21 व्या वर्षी राम नगर वार्डातून नगरसेवक झाले होते. मात्र त्यांचा 23 वर्षाचा रेकॉर्ड आर्या राजेंद्रन तोडणार आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!