Google Ad
Editor Choice india

Delhi : १५ ऑगस्टची तयारी झाली : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता?

महाराष्ट्र 14 न्यूज : यंदा ७४ व्या स्वातंत्र्य दिनावर कोरोनाचं सावट आहे. असं असलं तरीही लाल किल्ल्यावर आटोपशीर आणि सर्व सुरक्षांची काळजी घेऊन हा कार्यक्रम पार पडणार आहे. लाल किल्ल्यावर कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

यंदा आर्थिक पॅकेज, हेल्ड कार्डसंदर्भात मोठी घोषणा होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ ऑगस्ट रोजी उद्योगासाठी मोठ्या घोषणा शक्य आहेत. आत्मनिर्भर भारतासाठी काय रणनिती असेल यासंदर्भात पंतप्रधान मोदी संबोधन करू शकतात. रोजगार, गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते उपाय करता येतील याचा उल्लेखही ते करतील असं सांगितलं जात आहे.

Google Ad

दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा करतात. मागच्या वर्षी तीन तलाक आणि कलम ३७० संदर्भात घोषणा केली होती. राष्ट्रीय सुरक्षा स्वास्थ मिशनचा शुभारंभ लाल किल्ल्यावरून केला जाऊ शकतो असाही कयास आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

643 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!