Google Ad
Editor Choice india

Delhi : कोविड-१९ … लस घ्यायची आहे ? आधी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करा … सरकारचे आदेश!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी देशभरामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोनावरील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 3 कोटी कोरोना योद्धांना लस दिली जात आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना लसीकरण मोहिमेवर लक्ष देण्याचे आदेश दिलेत. त्यासाठी सर्व नागरिकांनी लवकरात लवकर त्यांचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करण्याचे आदेश मोदी सरकाने दिले आहेत.

लसीकरणासाठी ‘आधार’चा पुरावा असणे खूप गरजेचे आहे. या माध्यमातून आपण पहिला आणि दुसरा डोस कधी घेतला हे कळू शकेल. हिंदू बिझनेसलाईनने दिलेल्या बातमीनुसार, जर तुम्हाला या दोन्ही लशी घ्यायच्या असतील तर प्रथम तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करावा लागेल. तसंच, ‘लस कशी, कधी आणि कोणती देण्यात आली ही माहिती डिजिटल रेकॉर्ड करण्यासाठी आधार गरजेचे आहे’, असे कोविड 19 डेटा मॅनेजमेंट आणि एम्पॉवर्ड ग्रुप ऑफ टेक्नॉलॉजीचे चेअरमन आरएस शर्मा यांनी सांगितलं.

Google Ad

केंद्र सरकारने राज्यांना हे देखील सांगितले आहे की, ‘लोकांचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करा, जेणेकरून लसीकरणासाठी एसएमएस पाठवण्याची सुविधा उपलब्ध होईल.’ आरएस शर्मा यांनी पुढे असं सांगितलं की, ‘तुमचा सर्व डेटा सुरक्षित राहणार आहे. आम्ही दुसऱ्या पद्धतीने देखील रजिस्टर करु शकतो पण याठिकाणी आधार कार्डचा पर्याय सर्वात अचूक ठरणारा आहे.’

CoWin App द्वारे ठेवली जाणार नजर –

संपूर्ण लसीकरणाच्या प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी, लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या किंवा पहिला शॉर्ट घेतलेल्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी, लसीकरणाच्या संग्रहावर नजर ठेवण्यासाठी सरकारने Co-Win अॅप तयार केला आहे. हे अॅप डिजिटल प्लॅटफॉर्म असून याला विनामूल्य डाऊनलोड करता येऊ शकते.

Co-Win अॅपमध्ये आहे 5 विभाग –

लसीकरणाची प्रक्रिया, प्रशासकिय योजना, लसीकरण कर्मचारी आणि लसीकरण करणाऱ्या लोकांसाठी Co-Win अॅप हे व्यासपीठ म्हणून कार्य करेल. या Co-Win अॅपमध्ये ५ विभाग आहेत. पहिले प्रशासकीय विभाग, दुसरे नोंदणी विभाग, तिसरे लसीकरण विभाग, चौथे लाभ मंजूरी विभाग आणि पाचवे अहवाल विभाग. Co-Win वेबसाईटवरुन पाठवलेले प्रमाणपत्र पूर्णपणे क्यूआर कोडने सुसज्ज आहे.

या प्रमाणपत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसोबत कोरोनाला हरवण्याबाबतचा मंत्र ‘दवाई भी लिहिला आहे. क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र २८ दिवसांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर दुसरे प्रमाणपत्र दिले जाईल. ज्यामध्ये लाभार्थीचा फोटो लावलेला असेल. दरम्यान, १६ जानेवारीपासून सुरु झालेल्या या लसीकरण मोहिमेमध्ये मोठ्याप्रमाणात लोकांनी सहभाग नोंदवला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!