Google Ad
Editor Choice india

Delhi : अंत्यसंस्कारासाठी आलेले ४० लोक ढिगाऱ्याखाली आल्याने ठार … पावसामुळे छत कोसळले!

महाराष्ट्र 14 न्यूज : दिल्ली नजीकच्या गाझियाबादमधील मुरादनगर येथे मोठी दुर्घटना घडली आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गर्दी झाली होती. पावसामुळे सर्वांनी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या छताखाली आश्रय घेतला होता. त्याचवेळी अचानक इमारतीचे छत कोसळले. यात अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले गेले. अनेकांना तिथून बाहेरही निघता आले नाही. प्रशासनाने त्वरीत मदतकार्य सुरु केले. जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवले.

सततच्या पावसामुळे स्मशानभूमीत निर्माणाधीण अवस्थेतील इमारतीचे छत कोसळले. यात अंत्यसंस्कारासाठी आलेले लोक ढिगाऱ्याखाली आल्याने 40 जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याचे सांगण्यात येते. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Google Ad

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाच्या मदत पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरीत जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर येथे झालेल्या घटनेची माहिती घेतली.

त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना मदतकार्याबद्दल सूचना दिली असून पीडितांना हरतऱ्हेची मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या वारसदारांना 2-2 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी मंडल आयुक्त, अतिरिक्त पोलिस महासंचालकांना घटनेसंबंधीचा अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!