Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

गुन्हे शाखा , युनिट -३ , पिंपरी – चिंचवड पथकाकडुन एका इसमास अटक … ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त!

महाराष्ट्र 14 न्यूज : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील रेकॉर्डवरील गुन्हेगार , आरोपी , फरारी आरोपी , तडीपार आरोपी व गंभिर गुन्हे करणाया गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करुन , त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन वचक निर्माण करणेबाबत सुचना व मौखीक आदेश दिले. त्या आदेशाचे अनुषंघाने दि . ० ९ / ०१ / २०२१ रोजी गुन्हे शाखा , युनिट ३ पिंपरी चिंचवड चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांचे अधिपत्याखालील पोलीस उप निरीक्षक गिरीश चामले तसेच स.पो.फौ. पठाण , पो.हवा . ७५५ आढारी , पोना ४७ ९ सानप , पोना ४८० चव्हाण , पोना १६६६ भालचिम पोशि १२८१ कोळेकर

पोशि १३०२ केकाण , पोशि २२ ९ ६ जैनक व पोशि २३ ९९ बाळसराफ असे रेकॉर्डवरील गुन्हेगार , फरारी आरोपी , तडीपार आरोपी यांची माहीती घेत पेट्रोलींग करीत फिरत असताना चाकण पोलीस ठाण्याचे हददीत तळेगावचौक , चाकण , ता . खेड जि . पुणे येथे आले असता पोना सानप यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , “ महेश पडवळ नावाचा इसम त्याचेकडे एक गावठी पिस्तुल असुन तो चाकण मार्केट येथे जाणार आहे , त्याने अंगात पांढरे रंगाचा शर्ट व काळे रंगाची पॅन्ट परीधान केलेली असुन तोंडावर फिकट निळया रंगाचा युज अॅन्ड थ्रो मास्क लावलेला आहे ” अशी खात्रीशिर बातमी मिळाली असता सदरची बातमी ही वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांना कळविली असता , त्यांनी दिलेल्या सुचना मार्गदर्शनाखाली आंबेठाण चौक , चाकण , पुणे येथे सापळा लावला असता काही वेळातच आंबेठाण गावचे दिशेकडुन मिळालेल्या बातमीतील वर्णनाप्रमाणेचा इसम पायी येत असताना दिसला .

Google Ad

तो इसम हा बातमीतीलच इसम असलेची खात्री झाल्याने सर्व पथकाने त्यास १६.१५ वा . पकडुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव महेश बाळु पडवळ , वय- २० वर्षे , रा . मु.बोरदरा , पो . आंबेठाण , ता.खेड जि.पुणे असे असल्याचे सांगितले . त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे कि.रु. ५१,००० ची असा माल मिळुन आलेने त्याचे विरोधात चाकण पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३.५ ( २५ ) तसेच सह कलम महाराष्ट्र पोलीस कायदा ३७ ( १ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सदरची कारवाई पिंपरी – चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश सो , अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे सो , पोलीस उप आयुक्त श्री . सुधिर हिरेमठ सो , सहा.पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री आर.आर.पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक शंकर बाबर , पोलीस उप निरीक्षक गिरीश चामले तसेच स.पो.फौ.हजरत पठाण , पो.हवा.यदु आढारी , पो.ना. विठठल सानप , गंगाधर चव्हाण , महेश भालचिम पो.शि. योगेश्वर कोळेकर , नाथा केकाण , सागर जैनक व त्रिनयन बाळसराफ यांचे पथकाने केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!