महाराष्ट्र 14 न्यूज : सांताक्रूझ येथील आगरीपाडा रहिवासी संघ चाळ येथे एकमजली घराचा भाग कोसळून काकडे कुटुंबातील तीन लहान मुलींसह आई नाल्यात पडली होती. त्यापैकी आई आणि एका मुलीचा मृतदेह सापडला होता तर श्रेया काकडे यासांताक्रूझ येथील आगरीपाडा रहिवासी संघ चाळ येथे एकमजली घराचा भाग कोसळून काकडे कुटुंबातील तीन लहान मुलींसह आई नाल्यात पडली होती. त्यापैकी आई आणि एका मुलीचा मृतदेह सापडला होता तर श्रेया काकडे या सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह तब्बल चार दिवसानंतर सापडला आहे. त्यामुळे या घटनेत मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या तीन झाली आहे.
चार ऑगस्ट रोजी मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसात सांताक्रूझ पूर्व धोबीघाट येथे नाल्यालगतचा एकमजली घराचा वरचा भाग व जीना कोसळून नाल्यात पडला. त्यात घरातील रेखा काकडे (२६), जान्हवी काकडे दीड वर्ष, शिवन्या काकडे (तीन वर्ष) आणि श्रेया काकडे या माय लेकीही नाल्यात पडल्या होत्या. एनडीआरएएफ व अग्निशमन दलाच्या जवानांच्या शोधकार्यात शिवन्या ही जिवंत सापडली. रेखा व जान्हवी यांचा मृत्यू झाला तर श्रेया वाहून गेली होती. तिचा कसून शोध घेऊनही अग्निशमन दलाला ती सापडली नव्हती. या घटनेनंतर चार दिवसांनी म्हणजे सात ऑगस्ट रोजी श्रेयाचा मृतदेह भारत नगर पोलिस चौकी, बीकेसी, वांद्रे पूर्व येथे आढळून आला आहे, अशी माहिती अग्निशमन दलातर्फे देण्यात आली आहे.

176 Comments