महाराष्ट्र 14 न्यूज : आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे कोविड सेंटर असलेल्या एका हॉटेलला भीषण आग लागली असून यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. आज (रविवार) सकाळी ही दुर्घटना घडलीआग लागली त्यावेळी या स्वर्ण पॅलेस हॉटेल रुपांतरीत कोविड केअर सेंटरमध्ये ३० रुग्ण आणि १० वैद्यकीय कर्चचारी होते. या आगीच्या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत.

पण हॉटेलमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर धूर पसरला असून त्यामुळे इथल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दरम्यान, १७ रुग्णांना लॅडरच्या माध्यमातून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. इथल्या सुरक्षा रक्षकासह दोन कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरुन उड्या टाकल्या आहेत. एनडीआरएफचे कर्मचारी पीपीई किट घालून इथे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे.
14 Comments