Google Ad
Editor Choice Pune

‘आम्हाला मुलगाच पाहिजे’ … पीडित महिलेने केला सासरच्यांवर गुन्हा दाखल!

महाराष्ट्र 14 न्यूज : आपल्या पत्नीचा उपचाराचा खर्च परवडत नसल्याने सासरच्या चौघांनी तिचा छळ करून या विवाहितेला गर्भपात करण्यास सांगितले ; तसेच आम्हाला मुलगा पाहिजे! आणि मुलाच्या हव्यासापोटी सासरच्या चौघांनी मिळून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून वारंवार त्रास दिला. ही घटना फेब्रुवारी २००५ ते ऑक्टोबर २०१५ दरम्यान जुन्नर येथे घडली . या प्रकरणी पीडित महिलेने शनिवारी ( १ ऑगस्ट ) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

Google Ad

त्यानुसार तिला त्रास देणाऱ्या – पती , सासू – सासरे , नणंद आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पीडित महिला सासरी असताना आरोपींनी उपचाराचा खर्च परवडत नसल्याने तिला गर्भपात करण्यास सांगितले . महिलेने गर्भपातास नकार दिल्याने आरोपींनी आपसात संगनमत करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला . तसेच , ‘ आम्हाला मुलगाच पाहिजे व माहेराहून पैसे आण , ‘ अशी मागणी करून त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे . एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत .

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!