Google Ad
Editor Choice Maharashtra

कोरोनावरील सीरमची ‘ कोव्हिशिल्ड ‘ लस मिळेल ‘ इतक्या ‘ रुपयाला … अदर पुनावालांनी किंमत केली जाहीर!

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्राने जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम कंपनीच्या कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास रविवारी परवानगी दिली. यामुळे आता सर्वांच्या नजरा लसीकरण मोहीम कधी सुरु होणार याकडे लागल्या आहेत. दरम्यान सीरम कंपनीची कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर त्यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचीही चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे.

‘केंद्र सरकारने रिटेलमध्ये विक्री करण्यास परवानगी दिली तर कोरोनाची लस १००० रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तर दुसरीकडे सरकारला आपण हीच लस २०० रुपयांमध्ये देत असल्याचंही,’ त्यांनी सांगितलं आहे. सीरम केंद्र सरकारला १० कोटी करोना लसीचे डोस देणार आहे. केंद्र सरकारला प्रत्येक डोससाठी २०० रुपये मोजावे लागणार आहेत. ‘यानंतर टेंडर काढले जातील आणि किंमतीतही बदल होतील,’ अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे.

Google Ad

‘पण मला एक स्पष्ट करायचं आहे की, जे काही आम्ही सरकारला देणार आहोत ते लोकांना मोफत दिलं जाणार आहे. तर जेव्हा आम्ही खासगी मार्केटमध्ये याची विक्री करु तेव्हा प्रत्येक डोसची किंमत १००० रुपये इतकी असेल,’ असं अदर पुनावाला यांनी सांगितलं. लसला बूस्टर डोसची आवश्यकता असल्याने याची एकूण किंमत २००० असेल, सीरमकडे आता 5 कोटी करोना लसीचे डोस उपलब्ध आहेत.

अदर पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पुढील सात ते दहा दिवसांत सर्व औपचारिकता पूर्ण होतील आणि आम्ही एका महिन्यात ७ ते ८ कोटी लसींची पुरवठा करण्यासाठी निर्मिती करु’. पुढे त्यांनी सांगितलं की, ‘आम्ही करोना लसीची निर्यात किंवा खासगी मार्केटमध्ये विक्री करु शकत नाही. केंद्र सरकारने आम्हाला तसं सांगितलं असून आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करावी लागणार आहे. अनेक महत्वाच्या लोकांना लस देणं त्यांचं प्राधान्य असून आम्हीदेखील त्यांच्या निर्णयाचा आदर करतो’.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

38 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!