Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोविड -१९ प्रसार रोखण्यासाठी महानगरपालिकेने केले आवाहन … लसीकरणानंतरही मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या गोष्टी पाळणे आवश्यक!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि .२४ फेब्रुवारी २०२१ ) : केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांनुसार कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये आरोग्य सेवा देणा – या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी तसेच फ्रन्ट लाईन वर्कर यांना ही लस देण्यात आली आहे . पिंपरी चिंचवड मनपा मध्ये कोविड -१९ लसीकरण घेतलेल्या आरोग्य सेवा देणा – या ०३ अधिकारी व कर्मचारी यांना कोविड -१९ ची बाधा झालेली आढळून आली .

कोविड -१९ लसीकरण दोन टप्यांमध्ये केले जाते . पहिल्या डोस नंतर साधारणत : ८ ते १० दिवसानंतर शरिरात प्रतिपिंडे ( एन्टीबॉडीज ) तयार होतात . तसेच पहिल्या डोस नंतर साधरणत : ६५ टक्के इतकी प्रतिकारक्षमता तयार होते . दुस – या डोस नंतर साधारणत : १० ते १५ दिवसानंतर शरिरात उर्वरित प्रतिपिंडे ( एन्टीबॉडीज ) तयार होतात .

Google Ad

तसेच दोन्ही डोस घेतले नंतर साधारणत : ७० ते ९० टक्के इतकी प्रतिकार क्षमता तयार होते . त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभागाकडून आवाहन करण्यात येते की , कोविड -१९ प्रसार रोखण्यासाठी कोविड -१९ लसीकरणानंतरही मास्क , सॅनिटायझर व सामाजिक अंतर या गोष्टी पाळणे आवश्यक आहे . असे डॉ पवन साळवे अति.आरोग्य वैद्यकिय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी कळविले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!