Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोना अपडेट्स : पिंपरी चिंचवड शहरात ८१४ पॉझिटीव्ह रुग्ण … तर २२ मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि. २२ सप्टेंबर २०२० ) रोजी ८३२ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ८१४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील १८ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील २२ मृत झालेले रुग्ण हे चिंचवड (पुरुष ७६ वर्षे, पुरुष ७५ वर्षे, पुरुष ३४ वर्षे) भोसरी (पुरुष ७१ वर्षे,पुरुष ३६ वर्षे, पुरुष ६८ वर्षे, पुरुष ५८ वर्षे) पिंपरी (पुरुष ८४ वर्षे, स्त्री ५८ वर्षे, पुरुष ५९ वर्षे), तळवडे (पुरुष ५० वर्षे), सांगवी (पुरुष ६३ वर्षे, पुरुष ३५ वर्षे), ताथवडे (स्त्री ६५ वर्षे), पिंपळेनिलख (पुरुष ७५ वर्षे), वाकड (स्त्री ४६ वर्षे), आकुर्डी (पुरुष ५५ वर्षे), मोशी (स्त्री ४० वर्षे), निगडी (पुरुष ७० वर्षे), प्राधिकारण (पुरुष ६३ वर्षे), चिखली (पुरुष ५९ वर्षे), रुपीनगर (पुरुष ४९ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात १२ मृत झालेले रुग्ण हे चाकण (पुरुष २९ वर्षे, स्त्री ४७ वर्षे), धनकवडी (स्त्री ५८ वर्षे), वारजे (स्त्री ५३ वर्षे), मंचर (पुरुष ७३ वर्षे), लोणावळा (पुरुष ७९ वर्षे), वडगाव ( पुरुष ७५ वर्षे) मारुंजी (पुरुष ३४ वर्षे) इंदूरी (पुरुष वर्षे), जुन्नर (पुरुष वर्षे), आंबेगाव (पुरुष ७० वर्षे), सातारा (स्त्री ७२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील कळविलेल्या २२ मृत रुग्णांपैकी आज ०२ आणि यापुर्वी परंतु आज अहवाल प्राप्त झालेले मृत २० आहेत.

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!